Brydon Carse banned all format : सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सवर १६ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र, १३ महिन्यांची बंदी दोन वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की तीन महिन्यांच्या प्रभावी बंदीमुळे (२८ मे-२८ ऑगस्ट २०२४) तो क्रिकेटच्या सर्व स्वरूपांपासून दूर राहणार आहे. गेल्या वर्षी रीस टोपलीला दुखापत झाल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. आता या २८ वर्षीय गोलंदाजाला इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणे कठीण झाले आहे. वेस्ट इंडिज मालिकेसाठी कार्स संघात स्थान मिळवण्यासाठी वादात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१७-१९ दरम्यान विविध सामन्यांमध्ये ३०३ वेळा सट्टेबाजी –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्स यापैकी एकाही सामन्यात खेळला नाही, ज्यावर त्याने सट्टा लावला होता. ज्या सामन्यांवर कार्सने सट्टा लावला होता, ते पाच वर्षांपूर्वी झाले होते. या वेगवान गोलंदाजाने २०१७ ते २०१९ दरम्यान विविध सामन्यांवर ३०३ वेळा सट्टेबाजी केली होती. ईसीबीने कार्सवर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की ते क्रिकेट नियामकाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे समर्थन करतात.. गेल्या पाच वर्षांत या वेगवान गोलंदाजाने दाखवलेल्या विकासावर समाधानी असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

कार्सने मान्य केला आपला गुन्हा –

डरहमच्या वेबसाइटनुसार, कार्सने आपला गुन्हा मान्य केला आहे. तो म्हणाला, “हे सट्टे अनेक वर्षांपूर्वी लावले गेले होते, परंतु हे कोणतीही कारण नाही. मी माझ्या कृतींची संपूर्ण जबाबदारी घेतो. या कठीण काळात मला पाठिंबा दिल्याबद्दल मी ईसीबी, डरहम क्रिकेट आणि पीसीए यांचे आभार मानू इच्छितो. मी मैदानात परतल्यावर त्या पाठिंब्याची परतफेड करू शकेन याची खात्री करण्यासाठी पुढील १२ आठवडे कठोर परिश्रम घेईन.”

हेही वाचा – T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कसा राहिलाय टीम इंडियाचा प्रवास? जाणून घ्या..

ईसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले, की “आम्ही या बाबी अत्यंत गांभीर्याने घेतो आणि क्रिकेटमधील कोणत्याही भ्रष्टाचारविरोधी उल्लंघनाकडे दुर्लक्ष करत नाही. आम्ही ब्रेडन कार्सच्या प्रकरणातील सर्व निर्णयांना समर्थन देतो. ब्रेडनने या बाबतीत सहकार्य केले. आम्हाला आशा आहे की त्याची प्रकरण इतर खेळाडूंसाठी एक चांगले उदाहरण म्हणून काम करेल.” क्रिकेट नियामकाचे अंतरिम संचालक डेव्ह लुईस म्हणाले की, क्रिकेटचे नियामक अखंडतेचे कोणतेही उल्लंघन किंवा गैरवर्तन नियम गांभीर्याने घेतात.

इंग्लंडसाठी ब्रेडन कार्सची कामगिरी –

२८ वर्षीय ब्रेडन कार्सने २०२१ साली इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १४ एकदिवसीय सामन्यात १५ विकेट्स आणि ३ टी-२० सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. गतवर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासाठी त्याला इंग्लंड संघात परत बोलावण्यात आले होते. त्याला ईसीबीच्या केंद्रीय करारामध्ये दोन वर्षांचा करार देण्यात आला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England fast bowler brydon carse slapped with ban for 16 months after breaching ecbs gambling regulations vbm