जो रूट आणि केव्हिन पीटरसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेपर्यंत ४ बाद २४७ अशी मजल मारली आहे. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज इयान बेल २९ तर ख्रिस वोक्स १५ धावांवर खेळत होते. इंग्लंडचा संघ अजून २४५ धावांनी पिछाडीवर असून, फॉलोऑन टाळणे हे इंग्लंडपुढील महत्त्वाचे आव्हान असेल.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी ९ बाद ४९२ धावसंख्येवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडचा कप्तान अॅलिस्टर कुक (२५) आणि जो रूट यांनी ६८ धावांची दमदार सलामी नोंदवली. परंतु रयान हॅरिसने इंग्लंडला कुकला तंबूची वाट दाखवत पहिला हादरा दिला. मग जोनाथन ट्रॉटने ४० धावांची खेळी साकारून रूटला चांगली साथ दिली. रूटने ११ चौकारांसह वैयक्तिक ६८ धावा काढल्या. पीटरसन यानेही ५० धावा केल्या. परंतु मोठी खेळी उभारण्यात इंग्लिश फलंदाजांना अपयश आले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६० धावांत २ बळी घेतले.
इंग्लंडची चिवट झुंज
जो रूट आणि केव्हिन पीटरसन यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेपर्यंत ४ बाद २४७ अशी
First published on: 24-08-2013 at 07:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England fights stubbornly australia take a faint edge