England have announced their playing eleven for the third Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची ॲशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (६ जुलै) हेडिंग्ले मैदानावर सुरु होणार आहे. या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनेमध्य फक्त दोन बदल केले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात जेम्स अँडरसनचा समावेश केलेला नाही. इंग्लंड संघात दोन बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत ख्रिस वोक्स आणि मार्क वुडसह मैदानात उतरणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे संयोजन काय असेल?

जॅक क्रोली आणि बेन डकेट हे इंग्लंडचे सलामीवीर असतील. जो रूटशिवाय हॅरी ब्रूक आणि जॉनी बेअरस्टो सारखे फलंदाज मधल्या फळीत खेळताना दिसतील. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स आणि मोईन अलीच्या रूपाने दोन अष्टपैलू खेळाडू असतील. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी स्टुअर्ट ब्रॉडशिवाय ओली रॉबिन्सन, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स यांच्यावर खांद्यावर असणार आहे.

हेही वाचा – Sachin Tendulkar: लंडनमध्ये सचिन आणि युवराजच्या कुटुंबासोबत लंच करताना दिसला अजित आगरकर, मास्टर ब्लास्टरने शेअर केला फोटो

जेम्स अँडरसनशिवाय इंग्लंडचा संघ मैदानात उतरणार –

विशेष म्हणजे ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत २-० ने पुढे आहे. मात्र, यजमान इंग्लंडची नजर मालिकेत पुनरागमनाकडे असेल. त्याचबरोबर विजयाच्या शोधात इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपल्या संघात बदल केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला इंग्लंडने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन –

जॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ:

बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट, जोस टंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.

Story img Loader