England have announced their playing XI for 4th Test : इंग्लंडने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. संघ व्यवस्थापनाने रांचीच्या खेळपट्टीचा विचार करून संघात दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि लेगस्पिनर रेहान अहमद यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि फिरकी गोलंदाज शोएब बशीर यांनी संघात प्रवेश केला आहे. चौथी कसोटी शुक्रवारपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँडरसन सलग तिसरी कसोटी खेळणार –

४१ वर्षीय जेम्स अँडरसन सलग तिसरी कसोटी खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत इंग्लंडने तीन वेगवान गोलंदाजांना आजमावले असून अँडरसन त्यापैकी सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. त्याच्या नावावर सहा विकेट्स आहेत, तर वुडला फक्त चार विकेट घेता आल्या आहेत. या मालिकेतील रॉबिन्सनचा हा पहिलाच सामना असेल.

त्याचबरोबर रेहानचा परफॉर्मन्सही काही खास राहिला नाही. त्याला तीन कसोटीत ११ बळी घेता आले आहेत. बशीरला एकच कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत त्याने चार विकेट्स घेतल्या. तिसऱ्या कसोटीत त्याच्या जागी वुडचा समावेश करण्यात आला होता. रांचीमध्ये बशीरच्या फिरकीची जादू चालेल, अशी आशा इंग्लंडला असेल.

हेही वाचा – Manoj Tiwary : ‘तू मॅचनंतर बाहेर भेट, आज तू गेलास…’, गौतम गंभीरशी झालेल्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा

संघ व्यवस्थापनाने बेअरस्टोवर पुन्हा विश्वास दाखवला –

फलंदाजांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. संघ व्यवस्थापनाने फॉर्मात नसलेल्या जॉनी बेअरस्टोवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून जो रूटचा वापर केला जाईल. या कसोटीत स्टोक्स गोलंदाजी करतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे असेल. रांची कसोटीपूर्वी सराव सत्रातही तो गोलंदाजी करताना दिसला होता. याशिवाय चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी झॅक क्रोऊली आणि बेन डकेट यांच्यावर असेल. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी ऑली पोप, रूट, स्टोक्स आणि बेअरस्टो यांच्यावर असेल. बेन फॉक्स यष्टिरक्षकाची जबाबदारी सांभाळेल.

हेही वाचा – Mohammad Hafeez : ‘तुम्ही म्हणजे पूर्ण संघ नाही…’, हाफिजने बाबर आझमला असं का म्हटलं होतं? स्वतःच केला खुलासा

चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: झॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England have announced their playing xi for 4th test against ind and ollie robinson and shoaib bashir have been named vbm