जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीचा तिसरा आणि अखेरचा सराव सामना मात्र अनिर्णीत राहिला. हरयाणाने दिवसअखेर ४२ षटकांत ६ बाद १३३ धावा केल्या. हरयाणाकडून फक्त नितीन सैनीने अर्धशतक झळकावले. टिम ब्रेसनन याने दोन बळी घेतले.
त्याआधी, इंग्लंडने दुसऱ्या डावातही फलंदाजीचा चांगला सराव केला. पहिल्या डावातील शतकवीर केव्हिन पीटरसनने दोन चेंडूंचा सामना केला, पण तो भोपळाही फोडू शकला नाही. ऑफ-स्पिनर जयंत यादवने त्याला बाद केले. सलामीवीर जोनाथन ट्रॉटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने उपाहाराला २ बाद २२१ अशी मजल मारली होती. पण सहकारी खेळाडूंनाही फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून त्याने आपला डाव सोडला. परंतु त्यानंतर इंग्लिश संघाचा डाव कोसळला आणि ६ बाद २५४ अशी केविलवाणी अवस्था झाली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ५२१
हरयाणा (पहिला डाव) : ३३३
इंग्लंड (दुसरा डाव) : ७५.२ षटकांत ६ बाद २५४ डाव घोषित (निक कॉम्प्टन ७९, जोनाथन ट्रॉट १०१, इयान बेल ४८; संजय बधवार ३/५१).
हरयाणा (दुसरा डाव) : ४२ षटकांत ६ बाद १३३ (नितीन सैनी ५०; टिम ब्रेसनन २/१३)
तिसरा सराव सामनाही इंग्लंडने अनिर्णीत राखला
जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे लक्ष्य ठेवले.
First published on: 12-11-2012 at 01:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England kept third practce match undeclaired