जोनाथन ट्रॉटने साकारलेल्या शतकाच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ बाद २५४ धावसंख्येवर डाव घोषित केला आणि हरयाणासमोर विजयासाठी ४४२ धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीचा तिसरा आणि अखेरचा सराव सामना मात्र अनिर्णीत राहिला. हरयाणाने दिवसअखेर ४२ षटकांत ६ बाद १३३ धावा केल्या. हरयाणाकडून फक्त नितीन सैनीने अर्धशतक झळकावले. टिम ब्रेसनन याने दोन बळी घेतले.
त्याआधी, इंग्लंडने दुसऱ्या डावातही फलंदाजीचा चांगला सराव केला. पहिल्या डावातील शतकवीर केव्हिन पीटरसनने दोन चेंडूंचा सामना केला, पण तो भोपळाही फोडू शकला नाही. ऑफ-स्पिनर जयंत यादवने त्याला बाद केले. सलामीवीर जोनाथन ट्रॉटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने उपाहाराला २ बाद २२१ अशी मजल मारली होती. पण सहकारी खेळाडूंनाही फलंदाजीचा सराव मिळावा म्हणून त्याने आपला डाव सोडला. परंतु त्यानंतर इंग्लिश संघाचा डाव कोसळला आणि ६ बाद २५४ अशी केविलवाणी अवस्था झाली.
   संक्षिप्त धावफलक
इंग्लंड (पहिला डाव) : ५२१
हरयाणा (पहिला डाव) : ३३३
इंग्लंड (दुसरा डाव) : ७५.२ षटकांत ६ बाद २५४ डाव घोषित (निक कॉम्प्टन ७९, जोनाथन ट्रॉट १०१, इयान बेल ४८; संजय बधवार ३/५१).
हरयाणा (दुसरा डाव) : ४२ षटकांत ६ बाद १३३ (नितीन सैनी ५०; टिम ब्रेसनन २/१३)   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा