ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. केव्हिन पीटरसन, जेम्स अँडरसन व ग्रॅमी स्वान यांना या संघातून विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली. २०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आगामी वर्षांत भरपूर सामने इंग्लंडचा संघ खेळणार आहे. त्यासाठी या तीन खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी म्हणूनच त्यांना वनडे व ट्वेन्टी-२० संघात स्थान दिलेले नाही.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, डॅनी ब्रिग्ज, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, मायकेल कॅरबेरी, स्टीव्हन फिन, ख्रिस जॉर्डन, इऑन मॉर्गन, बॉईड रानकिन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल.
ट्वेन्टी-२० संघ : स्टुअर्ट ब्रॉड (कर्णधार), रवी बोपारा, टीम ब्रेसनन, डॅनी ब्रिग्ज, जोस बटलर, जेड डर्नबॅच, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, मायकेल लुम्ब, इऑन मॉर्गन, बॉईड रानकिन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल, ल्युक राईट.  

Story img Loader