‘दैव देते, अन् कर्म नेते’, याचा प्रत्यय अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी इंग्लंडपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यापुढे इंग्लंडची ३ बाद ३७ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण पावसाने ‘खो’ घातला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला. तीन कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडकडे २-० अशी आघाडी आहे.
डावाच्या सुरुवातीला धावांचे खाते न उघडताच इंग्लंडला कर्णधार अॅलिस्टर कुक (०)च्या रूपात धक्का बसला. त्यानंतर रयान हॅरिसने जोनाथन ट्रॉटला (११) बाद करीत दुसरा धक्का दिला. त्यानंतर पीटर सिडलने केव्हिन पीटरसनला (८) माघारी धाडत इंग्लंडची ३ बाद २७ अशी अवस्था केली. ऑस्ट्रेलिया वर्चस्व मिळवत विजयाच्या दिशेने कूच करेल, असे वाटत असतानाच पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर एकही चेंडू न टाकता सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा करण्यात आली. मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकही सामना न जिंकल्याने ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता येणार नाही, पण त्यांना मालिकेत बरोबरी करायची असेल तर आगामी दोन्ही सामने जिंकावे लागतील.
ऑस्ट्रेलियाच्या आशेवर पाणी
‘दैव देते, अन् कर्म नेते’, याचा प्रत्यय अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी इंग्लंडपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते.
First published on: 06-08-2013 at 05:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England retain the ashes after rain forces draw in third test