‘दैव देते, अन् कर्म नेते’, याचा प्रत्यय अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दिवशी इंग्लंडपुढे विजयासाठी ३३२ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यापुढे इंग्लंडची ३ बाद ३७ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण पावसाने ‘खो’ घातला आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णित राहिला. तीन कसोटी सामन्यांनंतर इंग्लंडकडे २-० अशी आघाडी आहे.
डावाच्या सुरुवातीला धावांचे खाते न उघडताच इंग्लंडला कर्णधार अॅलिस्टर कुक (०)च्या रूपात धक्का बसला. त्यानंतर रयान हॅरिसने जोनाथन ट्रॉटला (११) बाद करीत दुसरा धक्का दिला. त्यानंतर पीटर सिडलने केव्हिन पीटरसनला (८) माघारी धाडत इंग्लंडची ३ बाद २७ अशी अवस्था केली. ऑस्ट्रेलिया वर्चस्व मिळवत विजयाच्या दिशेने कूच करेल, असे वाटत असतानाच पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर एकही चेंडू न टाकता सामना अनिर्णित ठेवण्याची घोषणा करण्यात आली. मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकही सामना न जिंकल्याने ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकता येणार नाही, पण त्यांना मालिकेत बरोबरी करायची असेल तर आगामी दोन्ही सामने जिंकावे लागतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा