England beat West Indies by 241 runs : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा २४१ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनीही चांगली कामगिरी केली. इंग्लंडने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३८५ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला केवळ १४३ धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. या सामन्यात शोएब बशीरने इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली, तर हॅरी ब्रूक आणि जो रुटने शतक झळकावले.

इंग्लंडने दोन्ही डावात ४५० हून अधिक केल्या धावा –

इंग्लंडने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. त्यानंतर ओली पोपने संघासाठी १२१ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ७१ धावांची तर बेन स्टोक्सने ६९ धावांची खेळी केली. या खेळाडूंनी पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडकडून शतके झळकावली. जो रूटने १२२ आणि ब्रूकने १०९ धावा केल्या. याशिवाय ओली पोपने ५१ आणि बेन डकेटने ७६ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात ४२५ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.

इंग्लंडने प्रथमच केला हा खास पराक्रम –

कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच, इंग्लंड क्रिकेट संघाने दोन्ही डावात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंड संघ १९७७ पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. १८७७ मध्ये त्यांनी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. या कालावधीत, इंग्लंड संघाने १०७३ कसोटी सामने खेळले आहेत, परंतु एकाही कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ४०० चा टप्पा पार केला नव्हता. कसोटी खेळणाऱ्या संघाने दोन्ही डावात ४०० हून अधिक धावा करण्याची ही १२वी वेळ आहे.

हेही वाचा – पॅरिसला लष्करी तळाचे स्वरूप

जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी झळकावली शतकं –

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शतकं झळकावली. रूटने १२२ आणि ब्रूकने १०९ धावा केल्या. याशिवाय पहिल्या डावासह दुसऱ्या डावातही बेन डकेटने दमदार फलंदाजी केली. त्याने ७६ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच इंग्लंडने दुसऱ्या डावात ४२५ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी ३८५ धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १४३ धावा करू शकला. वेस्ट इंडिजसाठी दुसऱ्या डावात कर्णधार क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ४७ धावांची खेळी साकारली.