डय़ुसेलडॉर्फ : मोठय़ा स्पर्धात पेनल्टी शूटआऊटमधील आपला अपयशी इतिहास मागे सोडण्यात इंग्लंडला अखेर यश आले. तीन वर्षांपूर्वी युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत शूटआऊटमध्येच इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र याच स्पर्धेत नियोजित वेळेतील १-१ अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडचा ५-३ असा पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली.

शूटआऊटमध्ये गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डने स्वित्झर्लंडच्या मॅन्युएल अकांजीचा पहिलाच प्रयत्न अपयशी ठरवल्यानंतर ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्डने अखेरची पेनल्टी यशस्वी मारून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचे पाचही प्रयत्न यशस्वी ठरले.

Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What is the Irani Cup competition in domestic cricket and what is its history
इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास
Ireland Women Beat England Women Team by 5 wickets First Time in T20I
IRE W vs ENG W: आयर्लंडच्या महिला संघाने इंग्लंडला पराभूत करत घडवला इतिहास, १ चेंडू बाकी असताना मिळवला रोमांचक विजय, पाहा VIDEO
jannik sinner defeats taylor fritz in straight sets to win us open 2024 men title
सिन्नेरला जेतेपद : पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
us open 2024 aryna sabalenka beats jessica pegula in final to win third grand slam
सबालेन्काला विजेतेपद; महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या पेगुलावर मात
fritz sinner advance to final in 2024 us open
सिन्नेरचा अंतिम फेरीत प्रवेश ; उपांत्य लढतीत ड्रॅपरवर मात; अमेरिकेच्या फ्रिट्झचे आव्हान
American Jessica Pegula advances to US Open women singles final sport news
पेगुलाची अंतिम फेरीत धडक, मुचोव्हावर मात; आता अरिना सबालेन्काचे आव्हान

इंग्लंडने शूटआऊटमध्ये बाजी मारली असली, तरी नियमित वेळेत पहिली संधी स्वित्झर्लंडने साधली. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात फुटली. ७५व्या मिनिटाला ब्रीम एम्बोलेने एन्डोयोच्या क्रॉसवर चेंडूला अगदी अलगद गोलजाळीची दिशा देत स्वित्झर्लंडला आघाडीवर नेले. त्यानंतर पाच मिनिटांनी बुकायो साकाने गोलकक्षाच्या बाहेरून दिलेल्या वेगवान किकने गोलजाळीचा वेध घेतला आणि इंग्लंडला बरोबरी साधून दिली. इंग्लंडला २०२० च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात इटलीकडून शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्या वेळी साकाला पेनल्टी मारण्यात अपयश आले होते. या वेळी मात्र साकाने नियोजित वेळेत इंग्लंडला बरोबरी करून दिली आणि शूटआऊटमध्ये पेनल्टीही यशस्वी मारली.

हेही वाचा >>>IND vs ZIM 2nd T20 : रेकॉर्ड ब्रेकिंग विजयानंतर शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”आज काय होणार आहे हे…”

उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीचा पराभव करताना स्वित्झर्लंडने केलेला खेळ इंग्लंडविरुद्धही दिसून आला. इटलीविरुद्ध आघाडी मिळवून देणाऱ्या एम्बोलोनेच आजही स्वित्झर्लंडला आघाडीवर नेले. अंतिम संघनिवड आणि खेळाडूंच्या अदलाबदलीवरून सतत टीकेच्या घेऱ्यात अडकलेल्या साऊथगेट यांनी पिछाडीनंतर एकदम तीन बदल केले. कोल पाल्मर, ल्यूक शॉ आणि एबेरेची एझे यांना एकाच वेळी मैदानात उतरवले. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाचा वेग वाढला. गोलकक्षाच्या कडेवरून डेक्लन राईसने मारलेल्या किकने स्वित्झर्लंडच्या चाहत्यांना धडकी भरवली. मात्र, गोलरक्षक यान सोमरने हे निर्णायक आक्रमण शिताफीने परतवून लावले. अगदी अखेरच्या टप्प्यात स्वित्झर्लंडने एम्बोलोच्या जागी झेर्दान शकिरीला मैदानात उतरवले. त्याने उजव्या बगलेतून मुसंडी मारताना कोपऱ्यातून मारलेली किक गोलजाळय़ात जाता जाता राहिली. अखेरीस सामना बरोबरीत राहिला. बरोबरीची कोंडी अतिरिक्त वेळेतही न फुटल्याने अखेर पेनल्टी शूटआऊट झाले.

गोलजाळीचा अचूक वेध..

’ या सामन्यापूर्वी मोठय़ा स्पर्धामधील पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडला पाचपैकी केवळ एकाच सामन्यात यश आले होते, तर इंग्लंडला १० सामन्यांत केवळ तीन विजय मिळवता आले होते.

’ या सामन्यात मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी कोणतीही चूक केली नाही. इंग्लंडकडून कोल पाल्मर, ज्युड बेलिंगहॅम, बुकायो साका, आयव्हन टोनी आणि ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्ड यांनी गोलजाळीचा अचूक वेध घेतला.

’ स्वित्झर्लंडच्या अंकाजीची पहिली किक इंग्लंडचा गोलरक्षक पिकफर्डने अडवली. नंतर फॅबियन शेर, शकिरी आणि अम्डोउनी यांनी किक यशस्वीपणे मारूनही स्वित्झर्लंडच्या पदरी निराशा पडली.