England team has arrived in Hyderabad for the Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी रविवारी रात्री उशिरा इंग्लंड संघ हैदराबादमध्ये दाखला झाला. यानंतर इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत संघाचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. हैदराबादला पोहोचल्यानंतर खेळाडूंचे विशेष स्वागत करण्यात आले. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघ लवकरच सराव सुरू करणार आहे.
खरंतर इंग्लंड क्रिकेटने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये खेळाडूंचा विमानतळ ते हॉटेलपर्यंत पोहोचण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी रात्री हैदराबादला पोहोचला. हॉटेलमध्ये तिलक लावून खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. या व्हिडीओ पोस्टवर चाहत्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडने अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे.
भारताशी स्पर्धा करणे इंग्लंडसाठी सोपे असणार नाही. टीम इंडिया ही मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्याचा काही प्रमाणात फायदा भारताला होणार आहे. इंग्लंडकडे जो रूट आणि जॉनी बेअरस्टोसारखे अनुभवी खेळाडू आहेत. परदेशी भूमीवरही त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. संघात बेन डकेट आणि जॅक क्रोली यांचाही समावेश आहे. इंग्लंडचे गोलंदाजी आक्रमण खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे जेम्स अँडरसन आणि मार्क वुडसारखे घातक गोलंदाज आहेत.
हेही वाचा – VIDEO : सचिन तेंडुलकर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. या मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे होणार आहे. त्या सामन्याला सात मार्चपासून खेळवला जाईल.
भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, जॅक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून झाला बाहेर
पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.