वृत्तसंस्था, ग्लेसेनकिर्चेन

क्लब फुटबॉलमध्ये रेयाल माद्रिदसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर ज्युड बेलिंगहॅमने युरो अजिंक्यपद स्पर्धेतही आपली लय कायम राखली आहे. बेलिंगहॅमने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत सर्बियावर १-० असा संघर्षपूर्ण विजय नोंदवला.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
maharashtra vidhan sabha election 2024 hasan mushrif vs samarjit ghatge
लक्षवेधी लढत : मुश्रीफ- घाटगेंमध्ये पुन्हा लढत फक्त पक्ष बदलून
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

इंग्लंडच्या संघाला यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. गेल्या युरो स्पर्धेत इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा एक पाऊल पुढे जायचे झाल्यास इंग्लंडला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार असल्याचे सलामीच्या सामन्यानंतर स्पष्ट झाले आहे. उंचपुऱ्या खेळाडूंचा भरणा असलेल्या सर्बियाच्या संघाने इंग्लंडसमोर आव्हान उपस्थित केले. परंतु सर्बियाला अखेरपर्यंत गोलचे खाते उघडता आले नाही आणि इंग्लंडने निसटता विजय मिळवला.

हेही वाचा >>>Rohit Sharma : ‘मॅगीमॅन’ ते ‘हिटमॅन’पर्यंतचा कसा होता प्रवास? अभिषेक नायरने सांगितला रोहितच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट

नुकत्याच संपलेल्या क्लब फुटबॉलच्या हंगामात मध्यरक्षक असलेल्या बेलिंगहॅमने रेयाल माद्रिदसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. रेयालच्या संघाने ला लिगा, स्पॅनिश सुपर चषक, चॅम्पियन्स लीग अशा तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आणि या यशात बेलिंगहॅमची भूमिका महत्त्वाची होती. त्याने युरो स्पर्धेचीही सुरुवात दमदार केली. पूर्वार्धात बुकायो साकाच्या उजव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर जोरदार हेडर मारून गोल करत बेलिंगहॅमने इंग्लंडला १३व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. यानंतर बरोबरी साधण्याचे सर्बियाकडून बरेच प्रयत्न झाले. परंतु त्यांना यश मिळाले नाही.

वैयक्तिक पातळीवर माझ्यासाठी या स्पर्धेची सुरुवात फारच अप्रतिम झाली आहे. या गोलमुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. मी केलेला गोल संघाच्या विजयात निर्णायक ठरला याचा खूप आनंद आहे. – ज्युड बेलिंगहॅम, इंग्लंडचा मध्यरक्षक.