अँटवर्प : बेल्जियमविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय पुरुष संघाला जागतिक हॉकी लीगमध्ये कांस्यपदकासाठी आज इंग्लंडच्या कसोटीस उतरावे लागणार आहे.

भारतास बेल्जियमने उपांत्य फेरीत ४-० अशी धूळ चारली होती. पदक मिळविण्यासाठी भारताला अतिशय कठीण परीक्षेला उतरावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत इंग्लंडपेक्षा भारतीय संघ चार क्रमांकांनी खाली आहे. इंग्लंडला उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने ३-१ असे हरविले होते. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला जिद्दीने लढत दिली होती.

साखळी गटात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारल्यानंतर भारताने उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ करीत उपांत्य फेरी गाठली होती, मात्र तेथे त्यांनी यजमान बेल्जियमविरुद्ध सपशेल निराशाजनक खेळ करीत सामना गमावला होता.

Story img Loader