क्रिकेट आणि टेनिस या दोन्ही खेळांवर प्रेम करणाऱ्या जगभरच्या क्रीडारसिकांमध्ये रविवारी रात्री विचित्र गोंधळ सुरू होता. नेमका कोणता सामना पाहायचा? विम्बल्डनमध्ये रॉजर फेडरर वि. नोव्हाक जोकोव्हिच आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड वि. न्यूझीलंड हे दोन्ही सामने शेवटच्या क्षणापर्यंत विलक्षण उत्कंठावर्धक ठरले. शेवटच्या दीडेक तासात तर ही उत्कंठा इतकी शिगेला पोहोचली, की हा सामना पाहावा, तर त्या सामन्यातले साठवून ठेवावे असे क्षण निसटतील अशी स्थिती झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फेडरर-जोकोव्हिच हा सामना आधी संपला. दोन महान टेनिसपटूंमधील हे द्वंद्व फेडररच्या तुलनेत युवा असलेल्या जोकोव्हिचने जिंकले. पण सामना संपण्यापूर्वीच जगभरच्या टेनिसचाहत्यांच्या हृदयात फेडररचे स्थान अधिक भक्कम झाले. फेडररचा पराभव हा बहुतेक घरांमध्ये शोकांतिकेपेक्षा कमी नसतो. मात्र यंदा त्याने पाच तास, पाच सेट्समध्ये आणि १२-१२ अशी बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकरमध्ये पराभूत होण्यापूर्वी दाखवलेली ऊर्जा थक्क करणारी होती. पुढील कित्येक सामन्यांमध्ये फेडररचा खेळ पुनपुन्हा पाहावाच लागणार, याची सुखद प्रचीती या सामन्याने दिली. गतविजेत्या जोकोविचने पाचव्यांदा विम्बल्डन किताब पटकवताना आपण फेडरर किंवा नदाल यांच्यापेक्षा कोठेही कमी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथमच सुपरओव्हरमध्ये तोही शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. इंग्लंड पहिल्यांदा विश्वविजेते बनले, पण न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूपर्यंत दिलेली लढत खरोखरच कौतुकास्पद होती. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वाधिक चुरशीचा सामना ठरला. लंडनसारख्या टेनिसपंढरीत आणि क्रिकेटपंढरीत अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने हे सामने संपले आणि जगभरच्या क्रीडारसिकांसाठी उशिरापर्यंत जागरण झालेला हा थरारवार सत्करणी लागला! फेडरर-जोकोविच सामन्यातून नवीन विजेता गवसला नाही. क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यातून तो गवसला, इतकाच काय तो फरक.