उपांत्य फेरीत आगेकूच करण्यासाठी इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ‘सुपर सिक्स’ मुकाबल्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. साखळी गटात एकमेव लढत जिंकत आगेकूच करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेसाठीही हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत बलाढय़ इंग्लंडचे पारडे जड आहे.  कॅथरिन ब्रन्ट आणि अन्या श्रुसबोलेवर इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त आहे. आरन ब्रिंडलचा अष्टपैलू खेळही इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो.

Story img Loader