पात्र ठरणारा पहिला संघ; रुनीचा विक्रमी गोल
पुढील वर्षी होणाऱ्या युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन अर्थात युएफा युरो २०१६ स्पध्रेच्या पात्रता मिळवणाऱ्या संघांत इंग्लंडने पहिला क्रमांक लावला. युरो स्पध्रेच्या पात्रता फेरीत इंग्लंडने सॅन मारिनोचा
६-० असा धुव्वा उडवला. वॉन रुनीने या सामन्यात कारकीर्दीतला ४९वा गोल नोंदवला.
सॅन मारिनो स्टेडियमवर झालेल्या या लढतीत १३व्या मिनिटाला रुनीने पेनल्टीवर गोल करून इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलबरोबर रुनीने इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या चाल्र्टन यांच्या विक्रमाची बरोबरी साधली. १९६६ च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघातील चाल्र्टन यांनी १०६ सामन्यांत ४९ गोल केले आहेत. ३०व्या मिनिटाला सॅन मारिनोच्या क्रिस्टियन ब्रोल्लीने स्वयंगोल करून इंग्लंडची आघाडी २-० अशी मजबूत केली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राखत इंग्लंडने सामन्यावर पकड घेतली.
मध्यंतरानंतर ४६व्या मिनिटाला अ‍ॅलेक्स कॅम्बरलेनने गोलजाळीच्या उजव्या बाजूने अगदी सहजपणे रॉस बाक्र्लेकडे चेंडू सोपवला आणि त्याने गोल करून इंग्लंडची आघाडी वाढवली. त्यानंतर थेओ व्ॉल्कॉटने (६८ मि. व ७८ मि.) दहा मिनिटांच्या कालावधीत दोन गोल करून इंग्लंडचा ६-० असा विजय निश्चित केला. तत्पूर्वी, हॅरी केनने ७६व्या मिनिटाला इंग्लंडसाठी पाचवा गोल केला होता.
इंग्लंडने ‘इ’ गटात सातही सामने जिंकून युरो २०१६ स्पध्रेसाठी पात्रता मिळवली आहे आणि गटातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी त्यांना स्वित्र्झलडविरुद्धची लढत अनिर्णीत सोडवणे पुरेसे आहे. दुसरीकडे स्वित्र्झलडने बॅसेलमध्ये झालेल्या सामन्यात स्लोव्हेनियावर ३-२ असा विजय मिळवून युरो स्पध्रेतील आव्हान कायम राखले आहे.
मिलिव्होजे नोव्हाकोविक (४५ मि.) आणि बोस्टजॅन सेसर (४८ मि.) यांनी स्लोव्हेनियाला आघाडीवर ठेवले होते, परंतु शेवटच्या दहा मिनिटांत स्वित्र्झलडने तीन गोल करून विजय खेचून आणला. जोसीप
ड्रिमीक (८० व ९०+४ मि.) आणि व्हॅलेंटाईन स्टोकर (८४ मि.)
यांनी स्लोव्हेनियाच्या तोंडचा घास पळवला.
गतविजेत्या स्पेनची झेप
गतविजेत्या स्पेननेही युरो २०१६च्या पात्रतेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. नॉर्दन सिटी ऑफ ओव्हीएडो येथे झालेल्या सामन्यात स्पेनने ‘क’ गटातील लढतीत स्लोव्हाकियाचा २-० असा पराभव केला. जॉर्डी अ‍ॅल्बा (५ मि.) व अ‍ॅड्रेस इनिऐस्टा (३० मि. पेनल्टी) यांनी हा विजय साकारला.
‘‘संघाला चांगल्या परिस्थितीत ठेवण्याची आवश्यकता आहे. या लढतीतील आमचे काम संपले आणि आता पुढील सामन्याबाबत विचार करायला हवा,’’ असे मत इनिऐस्टाने व्यक्त केले.
बेलारुसचे आव्हान कायम
‘क’ गटात युक्रेन संघानेही बेलारुसवरील ३-१ अशा विजयानंतर युरो स्पध्रेसाठीचे आव्हान कायम राखले आहे. अ‍ॅर्टेम क्रॅव्हेट्स (७ मि.), अ‍ॅण्ड्री यार्मोलेंको (३० मि.) आणि येव्हेन कोनोप्लीयांका (४० मि. पेनल्टी) यांनी युक्रेनकडून गोल केले, तर बेलारुसच्या सेर्गेइ कोर्निलेंकोने ६१व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. याच गटात लक्सेंबर्ग संघाने सिबॅस्टियन थिल्लच्या एकमेव गोलच्या बळावर एफव्हायआर मॅकेडोनियावर १-० असा विजय मिळवला.
ऑस्ट्रियाचा प्रवेश एका गुणाने दूर
‘ग’ गटातून युरो स्पध्रेत प्रवेश मिळविण्याकरिता ऑस्ट्रियाला केवळ एका गुणाची आवश्यकता आहे. त्यांनी मोल्डोव्हावर १-० असा विजय मिळवून आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. झीलाट्को जुनूझोव्हीकने (५२ मि.) संघासाठी एकमेव गोल केला.

आजचे सामने
अर्मेनिया विरुद्ध डेन्मार्क
ल्ल वेळ : रात्री ९.२० वाजता
स्कॉटलंड विरुद्ध जर्मनी
अल्बानिया विरुद्ध पोर्तुगाल
फ्रान्स विरुद्ध सर्बिया
ल्ल वेळ : मध्यरात्री १२.०५ वाजता
ल्ल थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स एचडी, सोनी किक्स आणि सोनी सिक्स एसडी

सर बॉबी चाल्र्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केल्याचा आनंद होत आहे. या क्षणाचा अभिमान वाटतो. आता स्वित्र्झलडविरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्याचे आणि चाल्र्टन यांचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य आहे.
– वॉन रुनी

Story img Loader