ICC World Cup 2023: इंग्लंड क्रिकेट संघ गतविजेता असला तरी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पिछाडीवर पडल्याचे दिसते. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर संघावर अतिरिक्त दबाव आला आहे. संघाने ३ पैकी २ सामने गमावले आहेत, पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होता. संघाला आपला स्टार खेळाडू बेन स्टोक्सची उणीव भासत आहे जो दुखापतीमुळे बाहेर आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल आणि प्लेइंग ११ मध्ये त्याचा समावेश होऊ शकेल, अशी आशा मुख्य प्रशिक्षकाने व्यक्त केली आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले की, “संघाने पहिल्या ३ सामन्यात जरी २ पराभव पत्करले असले तरी पुढील सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ अजूनही चांगल्या कामगिरीची आशा बाळगून आहे. आमचा संघ अद्याप या पराभवांमुळे मागे पडलेला नाही.” मॉट पुढे म्हणाले, “आमच्याकडे अजूनही ग्रुप स्टेजमध्ये ६ सामने बाकी आहेत आणि त्यात पुनरागमनाची अपेक्षा आहे.”

how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

इंग्लंडचे प्रशिक्षक पुढे म्हणाले की, “प्रयत्न महत्वाचे आहे आणि मला वाटते की खेळाडू खूप परिश्रम करत आहेत.” मॉटने मंगळवारी पत्रकारांना पुढे बोलताना सांगितले की, “आपण कदाचित आपल्यातला तो आत्मविश्वास गमावत आहोत. तो परत मिळवण्यासाठी अप्रतिम कामगिरी करण्याची गरज आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा संघ बऱ्याच काळापासून विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तुम्ही एका रात्रीत तुमची क्षमता गमावत नाही, परंतु तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. विरोधकांवर दबाव आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. मागील दोन सामन्यांमध्ये खूप खराब झाली असून आम्हाला ते त्वरीत बदलण्याची गरज आहे.”

हेही वाचा: IND vs BAN: रोहितने बांगलादेशसाठी आखली रणनीती, सात वर्षानंतर हिटमॅनचे पुनरागमन; अश्विन गोलंदाजीचे धडे देतानाचा Video व्हायरल

इंग्लंडचे एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सांगितले की, “आमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना काही काळापासून स्टोक्सच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्टोक्सला मैदानात उतरवू शकतो.” मॅथ्यू मॉट म्हणाले की, “गेल्या २४ तासांत मला त्याच्या फिटनेसशी संबंधित कोणतेही अपडेट मिळालेले नाही पण त्याआधी तो दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात खेळू शकतो. त्याच्या पुनरागमनायाबाबत आम्हाला पूर्ण आशा आहे. मैदानात परतण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते तो पूर्णपणे करू शकतो.”

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर पुनरागमन…

बेन स्टोक्सने गेल्या वर्षीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. तो फक्त कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येच भाग घेत होता. पण २०२३ च्या विश्वचषकासाठी त्याने आपला विचार बदलला आणि मैदानात परतण्याची घोषणा केली. मात्र, दुखापतीमुळे तो आत्तापर्यंत २०२३च्या विश्वचषकातील एकही सामना खेळू शकलेला नाही.

हेही वाचा: SA vs NED: दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतर नेदरलँडच्या कर्णधाराचे मोठे विधान; म्हणाला, “आम्ही विश्वचषकात सेमीफायनल…”

इंग्लंडने दोन मोठे जेतेपद पटकावले होते

इंग्लंडला मागील विश्वचषक (२०१९) चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. यानंतर २०२२च्या टी२० विश्वचषकातही त्याच्याच बळावर इंग्लंडने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अशा परिस्थितीत आता इंग्लंडच्या आशा पुन्हा एकदा या दिग्गज अष्टपैलू खेळाडूवर टिकून आहेत. स्टोक्सच्या पुनरागमनाने इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावण्याची शक्यता असून ते पुन्हा एकदा विश्वविजेत्याप्रमाणे खेळताना दिसणार आहे.

Story img Loader