James Anderson Injured: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चर्चिल अॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा आर्चरनंतर आता अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतग्रस्त झाला आहे. काऊंटी क्रिकेट खेळताना जिमीला दुखापत झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. या दुखापतीमुळे जेम्स अँडरसनचे आयर्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणे साशंक आहे.
सॉमरसेटविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना जेम्स अँडरसनला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुखापतीनंतर तो मैदानात परतला नाही. तो सामना अनिर्णीत संपला. इंग्लंडला पुढील महिन्यात आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळायची आहे, ज्यात जेम्स अँडरसनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो मैदानात उतरतो की नाही हे पाहणे बाकी आहे. अँडरसन अॅशेस मालिकेसाठी तंदुरुस्त असावा असे इंग्लिश संघाला नक्कीच आवडेल.
जेम्स अँडरसनने हे अपडेट दिले –
जेम्स अँडरसननेही दुखापतीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसी पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान जेम्स अँडरसन म्हणाला, “मी माझ्या दुखापतीबद्दल काळजी करत नाही. दुखापत होणे हे कोणत्याही अर्थाने चांगले नाही, पण चांगली गोष्ट म्हणजे ही दुखापत तितकीशी गंभीर नाही. मला वाटते की, मी काही आठवड्यांत पूर्णपणे तंदुरुस्त होईल.”
हेही वाचा – IPL 2023: इरफान पठाणने दिल्ली कॅपिटल्सला दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, “पुढच्या हंगामात सौरव गांगुलीला …”
आता जगातील नंबर दोनचा कसोटी गोलंदाज अॅशेसपूर्वी इंग्लंडच्या जखमी गोलंदाजांच्या वाढत्या यादीत सामील झाला आहे. सामना अनिर्णित राहिल्यानंतर लँकेशायरचे मुख्य प्रशिक्षक ग्लेन चॅपेल म्हणाले, ‘पहिल्या डावात जिमीने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. दुखापतीबद्दल, मला वाटत नाही की ती गंभीर दुखापत आहे.”
हा खेळाडूही जखमी झाला आहे –
अॅशेस मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ दुखापतींशी सतत झुंजत आहे. आयपीएल २०२३ दरम्यान आघाडीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर जखमी झाला होता. त्याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्सही दुखापतीमुळे खेळू शकत नाही. अशा परिस्थितीत जेम्स अँडरसनच्या दुखापतीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाची चिंता वाढवली आहे.