ENG vs SL, World Cup 2023: विश्वचषकाच्या २५व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे, असे वाटलेच नाही. इंग्लिश फलंदाजांनी संघाला लाजवेल अशी खराब फलंदाजी केली. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांचा तो निर्णय चुकला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी लंकन गोलंदाजीसमोर अक्षरशः गुडघे टेकले. श्रीलंकेसमोर विजयासाठी केवळ १५७ धावांचे माफक लक्ष्य ठेवले आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. आज जर इंग्लंड पराभूत झाली तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.

इंग्लंडचा संघ १५६ धावांवरच आटोपला

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ १५६ धावांवर गारद झाला. २०१९ मध्ये विश्वविजेता बनलेल्या संघासाठी हा विश्वचषक खूपच वाईट ठरला आहे. या सामन्यातही हा संघ केवळ ३३.२ षटकेच खेळू शकला. बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने ३० आणि डेव्हिड मलानने २८ धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन विकेट्स घेतल्या. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्षणाने एक विकेट घेतली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पहिल्या डावात काय घडले?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान या जोडीने वेगवान सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मालन २८ धावा करून अँजेलो मॅथ्यूजचा बळी ठरला. मात्र, यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. जो रूट तीन धावा करून धावबाद झाला. बेअरस्टोला ३० धावांवर कसून राजिताने बाद केले. कर्णधार बटलर आठ धावा करून तर लिव्हिंगस्टोन एक धावा करून बाद झाला.

८५ धावांत पाच गडी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता. मात्र, बेन स्टोक्स एक बाजू सांभाळून झुंज देत उभा होता. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांकडून बुद्धिमान फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. इंग्लंडचे फलंदाज खराब फटके खेळून विकेट्स देत राहिले. मोईन अली १५, ख्रिस वोक्स शून्य आणि आदिल रशीद २ धावा करून बाद झाले. दरम्यान, बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावांवर खेळत राहिला. रशीदने निष्काळजीपणे फटका खेळत विकेट गमावली. शेवटी मार्क वुडही पाच धावा करून बाद झाला. विली १४ धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन विकेट्स घेतल्या. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाला मदत केली.

हेही वाचा: World Cup 2023: “वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध…”सुनील गावसकरांनी विराट कोहलीबद्दल केली मोठी भविष्यवाणी

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तिक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

Story img Loader