IPL Mini Auction 2023 Players List: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी तयारी सुरु झाली आहे. सोळाव्या हंगामासाठी आज कोची येथे मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या मिनी लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत लीगमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू उत्सुक असतात. पण एक खेळाडू असा आहे ज्याने या श्रीमंत लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. हा खेळाडू आहे, इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमद. या स्टार खेळाडूने आतापर्यंत इंग्लंडसाठी एकच कसोटी सामना खेळला आहे.

लेगस्पिनर रेहानने या महिन्यात १७ डिसेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत पदार्पण केले. तसेच, त्याने पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. यासह रेहानच्या नावावर पदार्पणाच्याच सामन्यात ५ बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडूचा विक्रमही नोंदवला गेला आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान

रेहानची मूळ किंमत ४० लाख रुपये होती –

इंग्लंडच्या या तरुण खेळाडूने आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली होती. त्याला शॉर्टलिस्टही करण्यात आले. रेहानची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. मात्र लिलावाच्या एक दिवस आधी त्याने आपले नाव मागे घेतले आहे. याचे कारण म्हणजे त्याला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. तसेच त्याच्या काऊंटी क्लबला वेळ द्यायचा आहे.

हेही वाचा – IPL Auction 2023 : स्टोक्स, करन, ग्रीनवर लक्ष!; आज ‘आयपीएल’ लिलावात परदेशी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता

रेहान अहमद सध्या कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायर संघाकडून खेळतो. जेव्हा त्याने आयपीएलच्या लिलावात आपले नाव दिले, तेव्हा त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लागेल, अशी दिग्गजांना अपेक्षा होती. यामध्ये इंग्लंड संघाचे सध्याचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचा समावेश आहे. मात्र रेहानने नाव मागे घेत सर्वांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत.

‘रेहानने आता आयपीएलमध्ये खेळावे’ –

रेहानने आता आयपीएलमध्ये खेळायला हवे, असे न्यूझीलंड संघाचा माजी स्टार खेळाडू ब्रेंडन मॅक्युलमचे मत होते. इतर खेळाडूंसोबत खेळल्याने त्याला वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल, जो त्याला उपयुक्त ठरेल. वयाच्या १८ व्या वर्षी रेहान पूर्णपणे आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला आहे.

हेही वाचा – IPL 2023 Auction: आज खेळाडूंचा लिलाव; जाणून घ्या मिनी लिलावापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे

किती खेळाडूंवर बोली लावली जाईल?

यावेळी मिनी लिलावात ४०५ खेळाडू उतरणार आहेत. ४०५ क्रिकेटपटूंपैकी २७३ भारतीय खेळाडू आहेत, तर १३२ परदेशी खेळाडू आहेत. १३२ परदेशी खेळाडूंपैकी ४ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत. एकूण ११९ कॅप्ड आणि २८२ अनकॅप्ड खेळाडू लिलावात सहभागी होतील. सर्व संघ एकूण ८७ खेळाडू खरेदी करू शकतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३० परदेशी खेळाडू असतील.