रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये शास्त्रींचं नाव आवर्जून घेतलं जातं. परंतु, त्यांच्या काळात भारतीय संघ एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. शास्त्री भारताचे प्रशिक्षक असताना विराट कोहली भारताचा कर्णधार होता. परंतु, आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्याने अपयशी ठरल्यामुळे शास्त्री आणि कोहली या दोघांनाही आपापल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं. शास्त्रींनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडकडे सोपवण्यात आली आहे. तर रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. रवी शास्त्री हे सध्या विश्वचषक स्पर्धेत इंग्रजी आणि हिंदी भाषेत समालोचन करताना दिसतात.

दरम्यान, रवी शास्त्री आता इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयसीसी विशवचषक स्पर्धा २०२३ मध्ये इंग्लंडचा संघ सपशेल अपयशी ठरला आहे. स्पर्धेत इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभवाची चव चाखली आहे. इंग्लंडचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघात बदल व्हावेत, तसेच प्रशिक्षक बदलण्याचा सल्ला दिला जात आहे. असाच सल्ला बुधवारी खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान एका चाहत्याने दिला. त्यावेळी सामन्याचं समालोचन करत असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार ऑईन मॉर्गन आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री या दोघांनी या पोस्टरवर एक टिप्पणीदेखील केली.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!

इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यादरम्यान, एका चाहत्याने पोस्टर झळकावून इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाला भारतीय प्रशिक्षक नियुक्त करण्याचा सल्ला दिला. हे पोस्टर पाहून ऑईन मॉर्गन याने रवी शास्त्री यांना प्रश्न विचारला की, रवी, इंग्लंड संघाचा प्रशिक्षक होण्याबाबत तुझा काय विचार आहे? मॉर्गनच्या प्रश्नावर रवी शास्त्री यांनी एक मजेदार उत्तर दिलं.

हे ही वाचा >> AUS vs AFG: अफगाणिस्तानच्या पराभवावर प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचे सूचक विधान; म्हणाला, “आम्ही त्याला यात मदत…”

रवी शास्त्री गंमतीत मॉर्गनला म्हणाले, हमको बुलाओ, हम तुम्हे हिंदी सिखाएंगे (मला बोलवा, मी तुम्हाला हिंदी भाषा शिकवायला येईन). इंग्लंडच्या संघाशी जोडल्यानंतर मी क्रिकेटपटूंना हिंदी शिकवेन आणि क्रिकेटच्या टिप्सदेखील देईन.

Story img Loader