Euro Cup 2024 Spain vs France Semi Final: युरो कप २०२४ च्या उपांत्य फेरीत स्पेनने फ्रान्सचा २-१ अशा फरकाने पराभव करत तब्बल १२ वर्षांनी अंतिम फेरी गाठली. फ्रान्सच्या संघाने सामन्याच्या सुरूवातीलाच गोल करत आघाडी मिळवली. एमबाप्पे आणि कोलू मुओनी यांनी युरो कप २०२४ च्या उपांत्य फेरीत ९व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर १६ वर्षीय खेळाडूने सामन्यात आपली मोलाची भूमिका बजावली आणि स्पेनकडून एक दणदणीत गोल केला. लॅमिने यामलने २५ यार्डावरून शानदार गोल करत स्पेनला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे तो युरो चषकाच्या इतिहासात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

बार्सिलोनासाठी एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आल्यानंतर, लॅमिने यामलने आंतरराष्ट्रीय मंचावर आपली प्रतिभा दाखवली आहे. यामलने संपूर्ण स्पर्धेत स्पेनसाठी चमकदार कामगिरी केली आणि फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने मोक्याच्या क्षणी गोली करत संघाला सामन्यात कायम ठेवले. संघ पिछाडीवर असताना या तरुण खेळाडूने बॉक्सच्या बाहेरून शानदार गोल करत फ्रान्सची आघाडी संपुष्टात आणली.

हेही वाचा – Euro Cup 2024: १२ वर्षांनंतर स्पेन युरो कपच्या अंतिम फेरीत, फ्रान्सविरुद्ध अवघ्या ४ मिनिटांत केले दोन गोल

यामलच्या गोलनंतर चार मिनिटांनी डॅनी ओल्मोने स्पेनसाठी दुसरा गोल केला आणि अशारितीने स्पेनने २-१ अशी आघाडी मिळवली. लॅमिने यामलने केलेल्या गोलमुळे तो युरोच्या इतिहासातील सर्वात तरुण गोल करणारा खेळाडू ठरला.

स्पेनने मंगळवारी फ्रान्सवर २-१ असा विजय मिळवून युरो चॅम्पियनशिप २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलो मुआनीने कायलियन एमबाप्पेने बॉल पास केल्यानंतर २१व्या मिनिटाला गोल केला. पण यामलच्या उत्कृष्ट गोलमुळे फ्रान्सने आघाडी घेतली. त्यानंतर चार मिनिटांनी डॅनी ओल्मोने गोल करत संघाला विजय मिळवून दिला. विक्रमी चौथ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेला स्पेन रविवारी बर्लिन येथे होणाऱ्या अंतिम फेरीत इंग्लंड किंवा नेदरलँड्सविरूद्ध खेळेल.