यूरो कप २०२० स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने पराभूत केलं. सेंट पीटर्सबर्ग मैदानात रंगलेल्या सामन्यात बेल्जियमचा स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकू चांगल्याच फॉर्मात दिसून आला. सामना सुरु झाल्यानंतर १० व्या आणि ८९ व्या मिनिटाला त्याने गोल मारले. मात्र या सामन्यापूर्वी फिनलँड आणि डेन्मार्क दरम्यात स्पर्धा रंगली होती. या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. पहिलं सत्र संपलं तेव्हा डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. एरिक्सन हा बेल्जियमचा स्टार फुटबॉलपटू रोमेलू लुकाकू याचा मिलान संघातील सदस्य आहे. एरिक्सनबद्दल ऐकल्यानंतर त्यालाही धक्का बसला. कारण मिलान संघासाठी खेळताना दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे ही बातमी ऐकताच तो अस्वस्थ झाला. मात्र एरिक्सन बरा असल्याचं कळल्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याचबरोबर रशियाविरुद्ध केलेला पहिला गोल त्यांने एरिक्सनसाठी असल्याचं जाहीर केलं.
रोमेलूने रशियाविरुद्ध १० व्या मिनिटाला गोल केला आणि थेट मैदानाजवळ असलेल्या कॅमेऱ्याजवळ गेला. आणि “ख्रिस, ख्रिस, खंबीर राहा. माझं तुझ्यावर प्रेम आहे.”, असं जोरात बोलला. यावेळी रोमेलूला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत.
“Chris! I Love You”
This is Football
Lukaku Went to the cameras and Said “Chris, I love you” After scoring his first Goal#Eriksen #bel #RUS #DEN #FIN #DENFIN #BELRUS #EURO2020 pic.twitter.com/VFGpwRlaSP— Agent.Football.007 (@AgentFootball02) June 12, 2021
दरम्यान, ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात पडल्याचे पाहताच डेन्मार्कच्या खेळाडूंनी त्याच्याजवळ धाव घेतली. तेव्हा बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ख्रिश्चियनभोवती रिंगण करुन ते उभे राहिले आणि त्याला धीर देत होते. या घटनेनंतर वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी ख्रिश्चियनला तपासले. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रसंगानंतर यूरो कप समितीने हा सामना काही वेळेसाठी स्थगित केला होता. या घटनेमुळे संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. फुटबॉल चाहतेही तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करताना दिसले.
Video: अन् तो धाडकन कोसळला….फुटबॉलर एरिक्सननंतर आता क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिसही जखमी
एरिक्सनची प्रकृती ठीक असल्याचे समोर आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. यात स्पर्धेतील नवख्या फिनलँडने बलाढ्य डेन्मार्कचा १-० पराभव करून इतिहासात नाव कोरले. फिनलँड प्रथमच प्रमुख आणि मोठ्या स्पर्धेत खेळत आहे.