यूरो कप २०२० स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बेल्जियमने रशियाला ३-० ने पराभूत केलं. सेंट पीटर्सबर्ग मैदानात रंगलेल्या सामन्यात बेल्जियमचा स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकू चांगल्याच फॉर्मात दिसून आला. सामना सुरु झाल्यानंतर १० व्या आणि ८९ व्या मिनिटाला त्याने गोल मारले. मात्र या सामन्यापूर्वी फिनलँड आणि डेन्मार्क दरम्यात स्पर्धा रंगली होती. या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. पहिलं सत्र संपलं तेव्हा डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. एरिक्सन हा बेल्जियमचा स्टार फुटबॉलपटू रोमेलू लुकाकू याचा मिलान संघातील सदस्य आहे. एरिक्सनबद्दल ऐकल्यानंतर त्यालाही धक्का बसला. कारण मिलान संघासाठी खेळताना दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. त्यामुळे ही बातमी ऐकताच तो अस्वस्थ झाला. मात्र एरिक्सन बरा असल्याचं कळल्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याचबरोबर रशियाविरुद्ध केलेला पहिला गोल त्यांने एरिक्सनसाठी असल्याचं जाहीर केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा