यूरो कप २०२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या शॉनं जलद गोल करण्याची किमया साधली. या स्पर्धेतील हा दुसरा जलद गोल आहे. तर यूरो कप इतिहासातील तिसरा जलद गोल आहे. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला हा गोल झळकावला. यापूर्वी डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात यूरो चषक इतिहासातला सर्वात जलद गोल झळकावला होता. हा गोल सामना सुरु झाल्यानंतर १ मिनिटं आणि ३९ सेकंद झाली असताना झळकावला होता. या गोलनंतर जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लूक शॉला स्थान मिळालं आहे. या यादीत रशियाच्या दीमित्री किरीचेनको याचं नाव आघाडीवर आहे.

ल्यूक शॉ (इंग्लंड)

यूरो कप २०२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या ल्यूक शॉन जबरदस्त गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामना सुरु झाल्यानंतर १ मिनिटं ५७ व्या सेकंदाला त्याने हा गोल झळकावला. यूरो कप २०२० स्पर्धेतील हा दुसरा जलद गोल आहे. मध्यरक्षक ट्रिपियरने त्याच्याकडे बॉल अचूक पास केला आणि त्याने त्याचं रुपांतर गोलमध्ये केलं.

युसूफ पॉलसेन (डेन्मार्क)

युरो चषक २०२० या स्पर्धेत डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं सर्वात जलद गोल मारला. हा गोल सामना सुरु झाल्यानंतर १ मिनिट ३९ सेकंदावर मारण्यात आला. या गोलमुळे युसूफची जलद गोल मारणाऱ्या खेळाडूंच्या यादी नोंद झाली आहे. सर्वात जलद गोल करणाऱ्यांच्या यादीत त्याला दुसरं स्थान मिळालं आहे.

दीमित्री किरीचेनको (रशिया)

जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दीमित्री किरीचेनको याचं नाव आघाडीवर आहे किरीचेनकोने यूरो चषक २००४ या स्पर्धेत जलद गोल झळकवण्याचा विक्रम केला होता. ग्रीस विरुद्धच्या सामन्यात १ मिनिट ७ सेकंद झाली असताना त्याने हा गोल केला होता. हा सामना रशियाने २-१ ने जिंकला होता. हा युरो चषकातील सर्वात जलद गोल म्हणून याची गणणा आहे.

रॉबर्ट लेवन्डोवस्की (पोलंड)

पोलंडचा फुटबॉल स्ट्रायकर रॉबर्ट लेवन्डोवस्की याने २०१६ च्या यूरो चषकात जलद गोल मारण्याची किमया साधली होती. या सामन्यात १०० व्या सेकंदाला अर्थात १ मिनिटं ४० व्या सेकंदाला त्याने गोल झळकावला होता. यावेळी समोर पोर्तुगलचा संघ होता. हा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये हा सामना पोर्तुगलने ३-५ ने जिंकला होता.

रॉबी ब्रॅडी (फ्रान्स)

जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फ्रान्सच्या रॉबी ब्रॅडीचंही नाव आहे. २०१६ च्या यूरो चषकात त्याने हा गोल झळकावला होता. बाद फेरीत फ्रान्स विरुद्ध रिपब्लिक ऑफ आयर्लंड सामना फ्रान्सने २-१ ने जिंकला होता. रॉबीने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल मारला होता.

सेरगई अलेन्किकोव (इंग्लंड)

इंग्लंडच्या सेरगई अलेन्किकोव याने ही किमया १९८८ च्या यूरो चषकात साधली होती. मात्र या सामन्यात सोव्हियत यूनियने इंग्लंडचा १-३ ने पराभव केला होता. सेरगई अलेन्किकोवने सामना सुरु झाल्यानंतर दोन मिनिटं आणि सातव्या सेकंदाला ही किमया साधली होती.

पीटर जिरासॅक (ग्रीस)

चेक रिपब्लिक विरुद्ध ग्रीस हा सामना यूरो चषक स्पर्धेत २०१२ साली रंगला होता. या सामन्यात पीटर जिरासॅक याने सामना सुरु झाल्यानंतर २ मिनिटं १४ सेकंद झाली असताना गोल झळकावला. मात्र हा सामना चेक रिपब्लिकने १-२ जिंकला.

अलन शीरर (जर्मनी)

यूरो चषक १९९६ स्पर्धेत सर्वात जलद गोल मारण्याची किमया जर्मनीच्या अलन शीरर याने साधली. त्याने २ मिनिटं १४ सेकंद झाली असताना गोल मारला. इंग्लंड विरुद्ध असलेला हा सामना बरोबरीत सुटला होता. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडने हा सामना ६-५ ने जिंकला.

मिशेल ओवन (पोर्तुगल)

पोर्तुगलकडून खेळणाऱ्या मिशेल ओवनने यूरो चषक २००४ या स्पर्धेत जलद गोल मारण्याची किमया साधली होती. यावेळी समोर इंग्लंडचा संघ होता. २ मिनिटं २५ सेकंदाला त्याने हा गोल झळकावला होता. हा सामना २-२ ने बरोबरीत सुटला होता. मात्र इंग्लंडने हा सामना पेनल्टी शूटऑउटमध्ये जिंकला

ऱ्हिस्टो स्टोचकोव्ह (बल्गेरिया)

युरो चषक १९९६ च्या स्पर्धेत बल्गेरियाच्या ऱ्हिस्टो स्टोचकोव्हने रोमानियाविरोधात जलद गोल मारला होता. सामना सुरु झाल्यानंतर अवघी २ मिनिटं २७ सेकंद झाली असताना त्याने हा गोल मारला होता. हा सामना बल्गेरियाने १-० ने जिंकला होता.

चस परेडा (स्पेन)

स्पेनच्या चस परेडा याने यूरो चषक १९६४ च्या स्पर्धेत सर्वात जलद गोल झळकावला होता. हा गोल त्याने ५ मिनिटं १७ व्या सेकंदाला केला होता. सोव्हिएत यूनियन विरुद्ध हा सामना होता. हा सामना स्पेननं २-१ने जिंकला होता.

Story img Loader