जवळपास महिनाभर चाहत्यांचे मनोरंजन करणारी यूरो कप २०२० स्पर्धा आता उपांत्य फेरीपर्यंत येऊन थांबली आहे. आज मध्यरात्री साडेबारा वाजता स्पेन आणि इटली हे दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन्ही संघात आज पहिला उपांत्य सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांचे फॅन-फॉलोइंग जबरदस्त असल्याने कोणता संघ अंतिम फेरीत धडक देणार यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यंदाच्या यूरो कप स्पर्धेत इटली हा असा संघ आहे, ज्याने सर्व सामने जिंकले आहेत. मात्र आज त्यांचा पराभव झाला, तर त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी पडू शकते. यूरो कपच्या बाद फेरीतील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांत स्पेनने दोन वेळा विजय मिळवला आहे. २०१६च्या यूरो कपमधील अंतिम-१६ फेरीत इटलीने स्पेनला २-० ने हरवून स्पर्धेबाहेर केले होते. तर, २००८च्या उपांत्यपूर्व फेरीच्या पेनल्टी शूट आउटमध्ये स्पेनने प्रथमच इटलीला पराभूत केले. २०१२च्या यूरो कपच्या अंतिम सामन्यात स्पेनने इटलीला ४-०ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.

हेही वाचा – COPA AMERICA 2021 : मेस्सी कोलंबियाविरुद्ध ठोकणार दीडशतक!

दोन्ही संघांमधील महत्त्वाचे मुद्दे

  • इटली आणि स्पेन एकमेकांशी ३७ वेळा भिडले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी ११ सामने जिंकले आहेत, तर १५ सामने बरोबरीत राखले आहेत.
  • स्पेनला इटलीविरुद्धच्या गेल्या सात लढतींपैकी फक्त एकच सामना गमवावा लागला आहे. २०१६च्या यूरो कपमध्ये इटलीच्या विजयात जॉर्जियो चिएलिनी आणि ग्राझियानो पेल्ले यांनी योगदान दिले होते.
  • यूरो कपमध्ये इटली आणि स्पेन सलग चौथ्यांदा आमने-सामने येणार असून यापैकी २००८मध्ये स्पेनने पेनल्टी-शूटआऊटमध्ये ४-२ असा आणि त्यानंतर २०१२च्या अंतिम फेरीत ४-० असा विजय मिळवला होता.

कुठे पाहता येणार सामना?

टीव्हीवर हा सामना सोनी टेन २ एसडी आणि एचडी, सोनी टेन ३ एसडी आणि एचडी (हिंदी) पाहता येईल. मोबाईलवर हा सामना सोली लीव, जिओ टीव्ही या अॅपवर पाहता येईल.

कुठे रंगणार सामना?

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

सामन्याची वेळ

भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री (७ जुलै) साडेबारा वाजता.