England vs Netherlands Semi Final Match Updates: इंग्लंडने युरो कप २०२४ मधील दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा युरो कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने प्रथमच देशाबाहेर आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी १९६६ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक आणि २०२० मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या युरो चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

येत्या रविवारी १४ जुलैला अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे. इंग्लंडला तब्बल ५८ वर्षांनंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. याआधी इंग्लंडने १९६६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. तर २०२०मध्ये युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचले पण विजेतेपद पटककावण्यात अपयशी राहिले.

अखेरच्या क्षणी गोल अन् इंग्लंड विजयी

सामना संपण्यापूर्वी दोन्ही संघ १-१ गोलने बरोबरीत असल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटवरच होईल असे वाटत होते. पण इंग्लंडच्या ऑली वॉटकिन्सने दिलेल्या अतिरिक्त मिनिटात गोल करत इंग्लंडला २-१ ने आघाडीवर नेले आणि अंतिम फेरी गाठली. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघांकडून १-१ गोल ​​झाले होते. सामन्याच्या १०व्या मिनिटाला नेदरलँड्सच्या जावी सिमन्सने बॉक्सच्या बाहेरून बॉल गोलपोस्टमध्ये पाठवत डच संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण ८ मिनिटांनी म्हणजेच १८व्या मिनिटाला हॅरी केनने गोल करत इंग्लंड संघाला सामन्यात बरोबरीत आणले. या गोलनंतर इंग्लंडच्या संघात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि हाफ टाईम संपेपर्यंत त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या.

हेही वाचा – मेस्सीच्या कुशीत असलेलं हे लहान बाळ घडवतंय इतिहास, स्पेनचा १६ वर्षीय लामिने यामल आणि दिग्गज मेस्सीचा फोटो व्हायरल

सामन्याच्या २५व्या मिनिटापर्यंत इंग्लंड संघाने चार संधी निर्माण केल्या आणि बॉल जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे ठेवला. ३८व्या मिनिटाला संघ पुन्हा गोल करण्याच्या जवळ आला. इंग्लंडचा युवा खेळाडू फिल फोडेनने डावीकडून दणदणीत शॉट मारला, पण नेदरलँडच्या गोलरक्षकाने चेंडू रोखून इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखले.

हेही वाचा – Euro Cup 2024: स्पेनच्या १६ वर्षीय खेळाडूने एक गोल करताच युरो कप स्पर्धेत रचला इतिहास

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला दोन्ही संघांकडून बदल करण्यात आले. नेदरलँड्सने डोन्याल मालेनच्या जागी व्होथ वेघोर्स्टला संघात घेतले, तर इंग्लंडने किरन ट्रिपियरच्या जागी ल्यूक शॉला संघात घेतले.

यासह दुसऱ्या हाफ संपण्याच्या २० मिनिटांपूर्वी, इंग्लंडने हॅरी केन आणि फिल फोडेन यांच्या जागी ऑली वॅटकिन्स आणि कोल पामर यांना संघात घेतले. इंग्लंडचा हा निर्णय अगदी योग्य ठरला, जेव्हा ऑली वॉटकिन्सने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत गोल करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली आणि विजयासह संघाने अंतिम फेरीत गाठली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Euro cup 2024 england beat netherlands by 2 1 and reached the final late goal from super sub ollie watkins bdg
Show comments