Euro Cup 2024 Spanish Player Lamine Yamal Record: युरो कप २०२४ च्या अंतिम फेरीत स्पेन विरुद्ध इंग्लंड यांच्या सामना खेळवला गेला. या सामन्यात स्पेनने उत्कृष्ट कामगिरी करत सामना २-१ ने जिंकला. या विजयासह विक्रमी ४ वेळा युरो कपचे जेतेपद पटकावणारा स्पेन पहिला संघ ठरला आहे. स्पेन संघाबरोबर या संघातील तरूण खेळाडू असलेला लामिने यामल यानेही एक विक्रम आपल्या नाव केला आहे. फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडू पेले यांचा विक्रम लामिने यामलने मोडला आहे.
हेही वाचा – Euro Cup 2024 Final: स्पेनकडून इंग्लंडचा २-१ ने पराभव; चौथ्यांदा युरो कप जिंकणारा ठरला पहिलाच संघ
लामिनेने उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यात महत्त्वपूर्ण गोल करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. यासह अंतिम सामन्यात खेळत लामिनेने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणारा स्पेनचा लामिने यामल हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. लामिनेचे वय १७ वर्षे आणि १ दिवस आहे.
यामलने पेले यांना मागे टाकत सर्वात कमी वय असणारा खेळाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला. १९५५८ च्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या पेले यांचे वय १७ वर्षे २४९ दिवस होते. तर लामिने हा पेले यांच्यापेक्षा २४८ दिवसांनी लहान आहे. अशारितीने लामिनेने पेले यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Euro Cup 2024: १७ वर्षीय लामिने यामलचे विक्रम
लामिने यामलने या स्पर्धेत मोडलेला हा पहिला विक्रम नाही. फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यामलने अनेक विक्रम रचले. युरो २०२४ मध्ये लामिने यामल हा १६ वर्षे आणि ३६२ दिवस वयाचा असताना स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने स्वित्झर्लंडच्या जोहान वोनलाथेनचा २००४ च्या सीझनमधील १८ वर्षे आणि १४१ दिवस वयाचा असताना गोल करण्याचा विक्रम मागे टाकला. लामिने यामलच्या विक्रमी गोलने फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या हाफमध्ये २१व्या मिनिटाला अप्रतिम कर्लिंग शॉट मारून स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला.
हेही वाचा – Euro Cup 2024: स्पेनच्या १६ वर्षीय खेळाडूने एक गोल करताच युरो कप स्पर्धेत रचला इतिहास
उपांत्य फेरीत गोल करण्यापूर्वी, लामिने यामलने मैदानात उतरताच आणखी एक विक्रम केला होता. वय वर्षे १७ असताना स्वीडन विश्वचषक स्पर्धेत महान पेले यांनी १९५८ मध्ये केलेल्या विक्रमाला मागे टाकत, मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणारा तो आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे.
१७ वर्षीय स्पॅनिश खेळाडू लामिने यामलने युरो २०२४ मध्ये आपल्या अतुलनीय कामगिरीने फुटबॉल जगताला भुरळ घातली आहे. बार्सिलोनाचा हा खेळाडू या स्पर्धेतील सर्वात चर्चेत असलेला खेळाडू बनला आहे. ज्याची लिओनेल मेस्सीशी तुलना केली जात आहे. काही दिवसांपूर्वी लामिने यामल आणि लिओनेल मेस्सी यांचा २००७ मधील फोटोशूटचा एक फोटोही व्हायरल झाला होता. युरो २०२४ मधील यमालच्या अविश्वसनीय मोहिमेने जागतिक फुटबॉलला अजून एक चॅम्पियन खेळाडू मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. विक्रम मोडण्याची आणि इतिहास घडवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यासारख्या दिग्गज खेळाडूंशीही त्याची तुलना केली जात आहे.