पॅरिस : फ्रान्स आणि इंग्लंड या संघांनी युएफा युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू राखताना शुक्रवारी सलग तिसऱ्या विजयांची नोंद केली.फ्रान्सने तुलनेने दुबळय़ा जिब्राल्टरचा ३-० असा, तर इंग्लंडने माल्टाचा ४-० असा पराभव केला. युरोपातील या दोनही आघाडीच्या संघांनी प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवले. जिब्राल्टरविरुद्ध फ्रान्सकडून ऑलिव्हिएर जिरुड आणि कर्णधार किलियन एम्बापे यांनी गोल केले. अमेन मोएलहीच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सला अधिक मोठा विजय मिळवता आला.
दुसरीकडे, माल्टाविरुद्ध फर्नाडो अपापच्या स्वयंगोलमुळे इंग्लंडचे गोलचे खाते उघडले. यानंतर ट्रेंट अलेक्झांडर-आर्नोल्ड (२८व्या मिनिटाला), कर्णधार हॅरी केन (३१व्या मि.) आणि कॅलम विल्सन (८३व्या मि.) यांनी गोल करत इंग्लंडचा विजय साकारला.
अन्य काही निकाल
फिनलंड २-० स्लोव्हेनिया
उत्तर मॅसेडोनिया २-३ युक्रेन
ग्रीस २-१ आर्यलड
बेलारूस १-२ इस्राइल
वेल्स २-४ अर्मेनिया
डेन्मार्क १-० नॉर्दर आर्यलड
अँडोरा १-२ स्वित्र्झलड