West Indies need 289 runs to win: शिवनारायण चंद्रपॉल हे नाव नव्वदीत क्रिकेट पाहणाऱ्या प्रत्येकाला पाठ असतं. डोळ्यांखाली टॅटू, काटक चणीचा डावखुरा आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने स्टान्स असणारा चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा आधारस्तंभ होता. ब्रायन लारा विक्रमांचे इमले उभारत असताना चंद्रपॉलने हळूहळू आपलं साम्राज्य साकारलं. कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही प्रकारात चंद्रपॉलने धावांच्या राशी वर्षानुवर्ष ओतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता.

वेस्ट इंडिजने चौथ्या डावात ४१८ धावा केल्या, त्या सामन्यात चंद्रपॉल सामनावीर ठरला होता. एकीकडे वेगवान शतक तर दुसरीकडे खेळपट्टीवर नांगर टाकून खेळण्यात चंद्रपॉल वाकबगार होता. १६४ कसोटीत ३० शतकांसह ११८६७ धावा ही चंद्रपॉलची कमाई. २६८ एकदिवसीय सामन्यात चंद्रपॉलच्या नावावर ८७७८ धावा आहेत. सलामीवीर, मधल्या फळीत, फिनिशर अशा विविध भूमिका चंद्रपॉलने लीलया पेलल्या.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट

२१ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजने किंग्स्टनच्या मैदानावर भारताला नमवलं होतं. त्या सामन्यात शिवनारायण चंद्रपॉलने पहिल्या डावात ५८ तर दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी केली होती. ५६२ धावा करणाऱ्या चंद्रपॉलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्या सामन्यात वेस्ट इंडिजने ४२२ धावांची मजल मारली. सलामीवीर वेव्हेल हाइंड्सने ११३ धावांची खेळी केली. ख्रिस गेल, रामनरेश सरवान, चंद्रपॉल, रिडले जेकब्स यांनी अर्धशतकी खेळी साकारल्या. भारतातर्फे हरभजन सिंगने ५ विकेट्स पटकावल्या होत्या.

हेही वाचा – Umpire Course: आयसीसीने अंपायरिंगसाठी सुरू केला शैक्षणिक अभ्यासक्रम, ऑनलाइन आणि विनामूल्य करता येणार कोर्स

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा पहिला डाव २१२ धावांतच आटोपला. व्हीव्हीएस लक्ष्मणने ६५ धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजतर्फे मर्व्हन डिल्लनने ५ विकेट्स पटकावल्या होत्या. वेस्ट इंडिजला २१० धावांची मोठी आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव १९७ धावांतच गडगडला. चंद्रपॉलची ५९ धावांची खेळी सर्वोत्तम ठरली. भारताकडून झहीर खानने ४ तर हरभजन सिंगने ३ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला ४०८ धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालं. वेस्ट इंडिजच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारताचा दुसरा डाव २५२ धावांतच आटोपला. सचिन तेंडुलकरने ८६ धावांची खेळी केली. पेड्रो कॉलिन्स, अॅडम सॅनफोर्ड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

सीनिअर चंद्रपॉल तेव्हा २७ वर्षांचा होता. या कसोटीला आता २१ वर्ष झाली. देदिप्यमान कारकीर्दीनंतर शिवनारायण यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यांचा मुलगा तेजनारायण यालाही क्रिकेटची आवड. वयोगट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे तेजनारायणला वेस्ट इंडिज संघाची द्वारं खुली झाली.२७ वर्षीय तेजनारायणने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ इथे कसोटी पदार्पण केलं. ७ कसोटीत तेजनारायणनने ३९.३३ च्या सरासरीने ४७२ धावा केल्या आहेत. तेजनारायणनने कसोटीत पहिलं शतक झळकावलं तेच द्विशतक होतं. झिम्बाब्वेविरुद्ध तेजनारायणनने नाबाद २०७ धावांची खेळी केली.

हेही वाचा – IND vs WI 2nd Test: दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी पावसाचा अडथळा, सामन्याला कधी होणार सुरुवात?

२७ वर्षीय तेजनारायणची भारताविरुद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या कसोटीत त्याला १२ आणि ७ धावाच करता आल्या. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ३३ धावांची खेळी केली. चंद्रपॉल यांची दुसरी पिढी मैदानात स्थिरावली तरी वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध जिंकण्याचा फॉर्म्युला गवसलेला नाही. २००२ च्या कसोटीत शिवनारायण २७ वर्षांचे होते. आज तेजनारायण २७ वर्षांचा आहे. पिढी बदलली, तरी वेस्ट इंडिजच्या कामगिरीत घाऊक घसरणच होत गेली आहे.