पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्यावर आपला विद्यार्थी हुरळून जाऊ नये, यासाठी रमाकांत आचरेकर सरांनी शतक झळकावल्यानंतरही सचिन तेंडुलकरला कधी ‘वेल डन’ म्हटले नाही. आचरेकर सरांबद्दलचा हा किस्सा सचिनने शनिवारी आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितला आणि काही तासांतच या विक्रमादित्य शिष्याला आचरेकर सरांनी तब्बल २९ वर्षांनंतर सचिनला शाबासकी दिली.
सचिनने क्रिकेटला अलविदा केल्यानंतर काही तासांनी त्याला ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या आचरेकर सरांनी सचिनला फोन करून ‘वेल डन’ म्हणत त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीचे कौतुक केले. जगभरातल्या चाहत्यांच्या प्रेमाइतकीच आचरेकर सरांची शाबासकी ही सचिनसाठी मोलाची ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा