एव्हरटन संघाने बलाढय़ मँचेस्टर सिटीचा २-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी खळबळजनक विजयाची नोंद केली. या पराभवामुळे जेतेपद पटकावण्याच्या मँचेस्टर सिटीच्या आशेला धक्का पोहोचला आहे.
१० जणांसह खेळणाऱ्या एव्हरटनला लिओन ओस्मान याने ३२व्या मिनिटाला सुरेख गोल करून आघाडीवर आणले. त्यानंतर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना निकिका जेलाव्हिच याने गोल करून एव्हरटनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य सामन्यांच, अर्सेनलने स्वानसी सिटी संघाचा २-० असा पाडाव करून पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे.