पुढील वर्षीपासून स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगचा हंगाम वर्षांतून दोनदा बहरणार आहे. ३० जानेवारी २०१६पासून तिसऱ्या हंगामाला हैदराबादच्या गचीबोली इनडोअर स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. दुसऱ्या हंगामाचे विजेते यु मुंबा आणि यजमान तेलुगू टायटन्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.
दोन टप्प्यातील साखळीचे सामने संपल्यानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर ४ आणि ६ मार्चला बाद फेरीचे सामने रंगणार आहेत. मशाल स्पोर्ट्स, स्टार इंडया आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघ यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत यापुढे वर्षांतून दोनदा प्रो कबड्डी लीग होणार आहे.
दुसऱ्या हंगामानंतर पाचच महिन्यांनी तिसरा हंगाम होणार आहे. आठ शहरांत ३४ दिवस रंगणाऱ्या या स्पध्रेत ६० सामने होणार आहेत. हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, पुणे, पाटणा, जयपूर, नवी दिल्ली, मुंबई या क्रमाने प्रत्येक संघाच्या शहरात चार दिवस सामने होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Every two years after pro kabaddi matches