“मला आठवतंय.. मी माझ्या मुलाला सांगत होतो की, लॉर्डस कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची बाजू उजवी आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी बजावली होती आणि त्याला अनुसरून भारताच्या दुसऱया ‘कसोटी’तही फलंदाजीची सुरूवात भक्कम झाली. भारत नक्की लॉर्डसवर विजय साजरा करेल.. असे बोललो होतो आणि तसेच झाले. पाया भक्कम करणे त्यातून प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करणे संघाला चांगले जमले यातून लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय साजरा केला गेला याचा मला आनंद आहे’ अशी प्रतिक्रिया क्रिकेटसुर्य सचिन तेंडुलकरने भारतीय संघाने सोमवारी तब्बल २८ वर्षांनंतर लॉर्डसवर विजय प्राप्त केल्यानंतर एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
कसोटीच्या पाचव्या दिवसाचे महत्व आणि दबाव लक्षात घेता भारतीय संघाने इंग्लंडभूमीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा विजय ऐतिहासिक आणि हा भारतासाठी मौल्यवान दिवस ठरल्याचेही सचिन म्हणाला.
तसेच “इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकणे फार महत्त्वाचीबाब आहे या विजयाने मला जोहान्सबर्ग(२००६) आणि डर्बन(२०१०) कसोटी सामन्यांतील भारताच्या विजयाची आठवण झाली. या सामन्यांमध्ये संघातील प्रत्येकाने विशेष कामगिरी करून विजयावर शिक्कामोर्तब केले होते. याही सामन्यात भारतीय संघातील प्रत्येकाने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे.” असेही सचिन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा