Sourav Ganguly said critics have stopped abusing me now : विराट कोहलीने २०२२ च्या सुरुवातीला विराट कोहलीने वनडे कर्णधारपद सोडल्यानंतर सौरव गांगुलीने रोहित शर्माला भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार नियुक्त केले होते. मात्र, त्यावेळी गांगुलीला या निर्णयामुळे चाहते आणि तज्ज्ञांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर गांगुलीने त्याच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सौरव गांगुलीने त्यांना आठवण करून दिली की, त्यानेच रोहितला कर्णधार नियुक्त केले होते.

रोहित २०२१ मध्ये कर्णधार म्हणून नियुक्त –

विराट कोहलीने २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. २०२२ च्या सुरुवातीला विराटने कसोटी कर्णधारपदही सोडले होते. यानंतर बीसीसीआयने विराटपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या रोहित शर्माला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला. रोहितला कर्णधारपद देण्यात बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांचा मोठा वाटा होता. या निर्णयामुळे गांगुलीवर बरीच टीका झाली होती.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

टीकाकारांनी आता शिव्या देणे बंद केले –

सौरव गांगुली म्हणाला की, आता प्रत्येकजण रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचा टी-२० विश्वचषक विजय साजरा करत आहे, परंतु गांगुलीनेच त्याला कर्णधार बनवले हे ते विसरले आहेत. त्याने सांगितले की त्यावेळी त्याच्यावर खूप टीका झाली होती, पण आता रोहितने संघाला यश मिळवून दिल्याने टीकाकारांनी त्याला शिव्या देणे थांबवले आहे.

हेही वाचा – IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

एका बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, “जेव्हा मी भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले, तेव्हा सर्वांनी माझ्यावर टीका केली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला आहे, त्यामुळे सर्वांनी मला शिव्या देणे बंद केले आहे. मला वाटते की मी त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवले हे सर्वजण विसरले आहेत.”

हेही वाचा – WCL 2024 : इरफान पठाणच्या जबरदस्त इनस्विंगरवर युनूस खान क्लीन बोल्ड, VIDEO होतोय व्हायरल

सौरव गांगुलीला दिल्ली संघाचा मुख्य प्रशिक्षक व्हायचे होते –

माजी भारतीय कर्णधाराने खुलासा केला की दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने रिकी पॉन्टिंगची साथ सोडल्याचे जाहीर केल्यानंतर त्याला पुढील मुख्य प्रशिक्षक बनायचे होते. तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा संचालक आहे. त्याने सांगितले की त्याला जेमी स्मिथला इंग्लंडमधून चाचणीसाठी आणायचे होते, परंतु वेळापत्रक जुळत नव्हते.