Kris Srikkanth backed Ruturaj Gaikwad after he was not selected for Indias T20 squad : भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रवाना होणार आहे. गुरुवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नाही. बोर्डाच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋतुराज गायकवाड सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्यामुळे आता निवडसमितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारतीय संघ निवडसमितीवर ताशेरे ओढले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला २७ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले आहे, तर शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, झिम्बाब्वे दौऱ्यावर चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघात स्थान मिळालेले नाही. यावरुन माजी दिग्गजाने बीसीसीआय आणि निवडसमितीला फटकारले आहे.

कृष्णमाचारी श्रीकांत काय म्हणाले?

निवडसमितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत आपल्या युट्यूब चॅनेलवर शुबमन गिलचा उल्लेख करताना म्हणाले की, “ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहता टी-२० संघात त्याची निवड होणं स्वाभाविक होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे आता ऋतुराजने अधिक धावा केल्या पाहिजेत, ज्यामुळे निवडसमितीला त्याच्या नावाचा विचार करावाच लागेल. कारण प्रत्येकाचे नशीब शुबमन गिलसारखे नसते.”

हेही वाचा – Mohammad Shami : दोघांनाही माझ्या बॉलिंगवर खेळायला आवडत नाही; मोहम्मद शमीचा विराट-रोहितबद्दल खुलासा, VIDEO व्हायरल

खरं तर, ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने चार सामन्यांच्या तीन डावात १५८.३३ च्या स्ट्राइक रेटने एकूण १३३ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या ७७* धावा होती. त्याच वेळी, गिलने पाच सामन्यांच्या पाच डावांमध्ये १२५.९२ च्या स्ट्राइक रेटने १७० धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या ६६ होती. गिलला शेवटच्या टी-२० सामन्यात संधी मिळाली असती तर तो या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकला असता, असे मानले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone is not lucky as shubman gill kris srikkanth backed ruturaj gaikwad after he not selected indias t20 squad vbm