इंडियन प्रीमियर लीगच्या संस्थापकांपैकी एक असलेला ललित मोदी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. भारतीय अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत ललित मोदीचे काही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशातच बीसीसीआयच्या चुकीच्या अकाउंटला टॅग केल्यामुळे मोदीला ट्रोल करण्यात आले होते. या मुद्यावरून ललित मोदीने आता माध्यमांवर जोरदार टीका केली आहे. भारतीय माध्यमांमध्ये ‘अर्णब गोस्वामी’ होण्यासाठी स्पर्धा लागल्याचंही ललित मोदीचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ललित मोदीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट लिहून भारतीय पत्रकार आणि माध्यमांना खडसावले आहे. मोदीने लिहिले आहे की, “माध्यमांना काय अडचण आहे? ते मला चार चुकीच्या टॅगसाठी ट्रोल का करत आहेत? मी फक्त दोन फोटो पोस्ट केले होते आणि त्यांचे टॅग योग्य आहेत. प्रत्येकाने अर्णब गोस्वामी बनण्याची गरज नाही. तो भारतातील सर्वात मोठा विदुषक आहे. माध्यमांनी योग्य बातमी लिहावी. तुम्ही स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या.”

ललित मोदीने ‘ऑफिशिअल बीसीसीआय’ या चुकीच्या अकाउंटला टॅग केले होते. त्यामुळे माध्यमांनी मोदीला ट्रोल केले होते. शिवाय, मोदीची पहिली पत्नी मीनल त्याच्या आईची मैत्रीण होती, अशी बातमी माध्यमांनी दिली होती. याबाबत मोदीने स्पष्टीकरण दिले आहे. “मीनल माझ्या आईची मैत्रीण नव्हती. ती आणि मी १२वर्षांपासून मित्र होतो. माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये”, असे मोदीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.