Aishwarya Rai Comment By EX Pakistani Cricketer: माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने नुकत्याच झालेल्या एका पत्रकार कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चनबद्दल केलेल्या हीन कमेंटने नेटकरी भडकले आहेत. आयसीसी विश्वचषक २०२३ मधील संघाच्या कामगिरीबद्दल पाकिस्तानी मीडियातर्फे प्रश्न विचारले जात असताना रझाकने ऐश्वर्या रायचे नाव घेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला. यामध्ये रझाकचा टोला खरंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला असला तरी त्यासाठी वापरलेले शब्द हे पातळी सोडून होते असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या खेळानंतर रझाककर्णधार म्हणाला, “कर्णधार म्हणून युनूस खानचा हेतू चांगला होता आणि त्यामुळे मला चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला. इथे प्रत्येकजण पाकिस्तानच्या संघाच्या हेतूविषयी चर्चा करत आहे. वास्तविक, पाकिस्तानमध्ये खेळाडू विकसित करण्याचा आणि त्यांचे स्किल पॉलिश करण्याचा कोणाचाच हेतू नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ऐश्वर्या रायशी लग्न करून एक चांगला आणि पवित्र मुलगा जन्माला येईल, तर असे कधीच होणार नाही.

Saba Azad
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
Harshit Rana says about concussion substitute I am not bothered response after IND vs ENG 1st ODI
IND vs ENG : ‘मी अशा गोष्टीकडे अजिबात…’, कन्कशन वादावर बोलताना हर्षित राणाने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Gashmeer Mahajani on Chhaava Controversy
Video: एकाच चित्रपटात दुहेरी ऐतिहासिक भूमिका करणारा गश्मीर महाजनी ‘छावा’च्या वादाबद्दल म्हणाला, “माझा अनुभव…”
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”

२०२३ च्या क्रिकेट विश्वचषकातील पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रवास अत्यंत लाजिरवाणा होता. बाबर आझमच्या संघाला नऊ सामन्यांपैकी फक्त चार विजय मिळवता आले. त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा फार वाईट होती झाली. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागलाच पण तुलनेने नवख्या अफगाणिस्तानने सुद्धा बाबर आझमच्या संघाला धूळ चारली होती.

Video: अब्दुल रझाक बरळला..

विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर संघाला जोरदार टीकेला सामोरे जावे लागले. बाबर आझमचे नेतृत्व, कुचकामी फिरकी गोलंदाजी आणि संघाची तयारी आणि रणनीती याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सुद्धा उपस्थिती होता. रझाकच्या या वक्तव्यानंतर निषेध करण्याऐवजी आफ्रिदी हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसला. त्यामुळे नेटकऱ्यांनी अब्दुल रझाकसहा आफ्रिदीवर सुद्धा ताशेरे ओढले आहेत.

Story img Loader