आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण
राजस्थान रॉयल्स संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज हरमित सिंग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचाराविरोधी समितीचे प्रमुख रवी सवानी यांच्या चौकशीला सामोरा गेला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पॉट फिक्सिंगसाठी अजित चंडीलाने फेब्रुवारी महिन्यात मुंबईत काही बुकींशी ओळख करुन दिली असल्याचे हरमित सिंगने मान्य केले आहे. याआधीही हरमित स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव गोवलेगेल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या चौकशीला सामोरा गेला होता. त्यानुसार बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने हरमितला चौकशीसाठी पाचारण केले.
हरमितने चौकशी दरम्यान स्पष्ट केले की, “अजित चंडीलाने मला मुंबईत असताना एका हॉटेलमध्ये नेले होते. तेथे त्याने त्याच्या काही मित्रांशी ‘ये मेरे भाई लोग’ अशी ओळख करून दिली. त्यानंतर त्यांच्या सामना फिक्सिंगच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावरुन ते बुकी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावेळी मी त्यांना मला यात पडायचे नाही असे सांगून स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्यांची चर्चा सुरूच होती “श्रीशांत और अंकीत तो अपने है, वो कर लेंगे” असा त्यांच्यात संवाद सुरू होता. असेही हरमित सिंगने चौकशी दरम्यान म्हटले आहे.   

Story img Loader