चेस ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या ज्योतीचे पुण्यात जल्लोषात स्वागत

पुणे : भारतीय स्पर्धकांची तयारी पाहता यंदा भारतीय बुद्धिबळपटू चेस ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी करतील अशी आशा आहे, असे मत ग्रँडमास्टर अभिजित कुंटेने शनिवारी व्यक्त केले.

loksatta lokrang Andhra Pradesh and Telangana have a rich tradition of chess
आदर्श घ्यावा असा…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
World champion chess player D Gukesh feelings about the match sport news
दडपणाचा सामना महत्त्वाचा; जगज्जेता बुद्धिबळपटू डी. गुकेशची भावना
Indian players chess
सोव्हिएत वर्चस्वाचे भारतीय प्रारूप?
d Gukesh
D Gukesh : आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण! जगज्जेतेपदाचा चषक स्वीकारताना गुकेशची भावना
Garry Kasparov on d gukesh
बुद्धिबळातील सर्वोच्च शिखर सर, सर्वांत युवा जगज्जेत्या गुकेशची कास्पारोव्हकडून स्तुती
D Gukesh World Championship prize money
D Gukesh : विश्वविजेत्या गुकेशचं बक्षीस पंतच्या IPL लिलावातील किमतीच्या निम्म्याहूनही कमी; १३ क्रिकेटपटूंना मिळालेत जास्त पैसे
Gukesh D to win World Chess Championship
D Gukesh : गुकेशच्या जगज्जेतेपदाचं धोनी कनेक्शन! क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या प्रशिक्षकाने केली मदत

४४वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा यंदा जुलै महिन्यात चेन्नई शहरात होणार आहे. यानिमित्ताने भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे चेस ऑलिम्पियाडची ज्योत सध्या भारतातील काही महत्त्वपूर्ण शहरांत नेली जात आहे. या ज्योतीचे शनिवारी हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

‘‘चेस ऑलिम्पियाडमध्ये यावर्षी भारताचे दोन संघ सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्राचे चार खेळाडू, तीन प्रशिक्षक यांचा समावेश असून, भारताची तिसरा सहभागी झाल्यास आणखी दोन खेळाडू वाढण्याची शक्यता आहे. यंदा दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी हे पहिल्यांदाच ऑलिम्पियाडमध्ये सहभागी

होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करतील याबाबत मला खात्री आहे,’’ असे कुंटे यावेळी म्हणाले.चेस ऑलिम्पियाडच्या ज्योतीचे हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही ज्योत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडे पुढील प्रवासासाठी सुपूर्द केली. यावेळी सिद्धार्थ मयूर, अनिरुद्ध देशपांडे, ईशा करवडे आणि अंजली भागवत उपस्थित होते.

Story img Loader