भारत दौऱ्यासाठी पाकिस्तानचे संघ जाहीर
भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघातून अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आणि अब्दुल रझाक यांना वगळण्यात आले आहे. परंतु या दोघांना ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. भारत दौऱ्यासाठी पाकिस्तानने जाहीर केलेल्या दोन संघांमध्ये क्रिकेटरसिकांना अनेक आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाले.
२००७नंतर प्रथमच भारत-पाकिस्तान या दोन परंपरागत प्रतिस्पध्र्यामध्ये मालिका होत आहे. पाकिस्तानचा संघ २२ डिसेंबरपासून पाच सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येत आहे.
‘‘२०१५चा विश्वचषक आणि आयसीसीच्या अन्य महत्त्वाच्या स्पर्धाच्या पाश्र्वभूमीवर आम्ही पाकिस्तानचा संघ बांधत आहोत. त्यासाठीच आम्ही युवा खेळाडूंना संघात अधिक प्रमाणात स्थान दिले आहे,’’ असे पाकिस्तान क्रिकेट निवड समितीचे प्रमुख इक्बाल कासिम यांनी सांगितले. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे युवा डावखुरा फिरकी गोलंदाज रझा हसनचा संघात समावेश करण्यात आलेला नाही, असे कासिम यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी साकारणाऱ्या झुल्फिकार बाबरचा दोन्ही संघांमध्ये समावेश करण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड समितीने वेगवान गोलंदाज असद अलीचा पाकिस्तान संघात समावेश केला आहे.
* पाकिस्तानचे संघ
ट्वेन्टी-२० मालिकेसाठी :मोहम्मद हाफीझ (कर्णधार), नासिर जमशेद, कमरान अकमल, उमर अकमल, उमर अमिन, शोएब मलिक, शाहीद आफ्रिदी, सईद अजमल, मोहम्मद इरफान, जुनैद खान, सोहेल तन्वीर, उमर गुल, असद अली, झुल्फिकर बाबर, अहमद शहझाद.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ : मिसबाह-उल-हक (कर्णधार), नासिर जमशेद, मोहम्मद हाफीझ, अझर अली, युनूस खान, हरिस सोहेल, कमरान अकमल, सईद अजल, वहाब रियाझ, जुनैद खान, उमर गुल, झुल्फिकार बाबर, इम्रान फरहत, अन्वर अली.
अनुभवी आफ्रिदी, रझाक यांना एकदिवसीय संघातून वगळले
भारत दौऱ्यासाठी पाकिस्तानचे संघ जाहीरभारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानच्या संघातून अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी आणि अब्दुल रझाक यांना वगळण्यात आले आहे. परंतु या दोघांना ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. भारत दौऱ्यासाठी पाकिस्तानने जाहीर केलेल्या दोन संघांमध्ये क्रिकेटरसिकांना …
First published on: 12-12-2012 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Experienced afridi razzak skiped in oneday team