बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंत शिउलीसारखे वेटलिफ्टिंगपटू भारतासाठी ‘हिरो’ ठरले आहे. त्यांनी आपल्या शरीराच्या वजनाच्या कित्येक पट जास्त भार पेलवून दाखवला आहे. त्यांची ही कामगिरी बघून अनेकदा प्रश्न पडतो. हे खेळाडू आपल्या शरीराच्या वजनापेक्षा दुप्पट-तिप्पट भार कसा पेलतात? ही सर्व गोष्ट खेळातील तंत्र आणि गुरुत्वाकर्षणाभोवती फिरते. गंमत म्हणजे जर वेटलिफ्टिंगपटू म्हणून तुमची कमी असेल तर त्याचा जास्त फायदा होतो.

२०१४ आणि २०१८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सतीश शिवलिंगम यांनी काही अनुभव सांगितले आहेत. आपल्या शरीराच्या वजनाच्या दुप्पट किंवा तिप्पट वजन उचलताना एका खेळाडूच्या शरीराला काय अनुभव येतो याचे त्यांनी वर्णन केले आहे. “वजन उचलल्यानंतर तुमची श्वसननलिका आकुंचित होते. त्यामुळे तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. तुमची मज्जासंस्था व्यावहारिकरित्या कार्य करणे थांबवते. परिणामी तुमच्या मेंदूपर्यंत कोणताही सिग्नल पोहोचत नाही. तुम्हाला चक्कर येऊ लागते आणि शेवटी संपूर्ण ब्लॅकआउट होतो,” अशी परिस्थिती उद्भवत असल्याचे सतीशने सांगितले.

what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
NVIDIA CEO Jensen Huang (left) with Reliance Industries chairman Mukesh Ambani (right).
‘एआय’ नवोपक्रमांसाठी रिलायन्स, एनव्हीडिया भागीदारी
Pimpri  Municipal Corporation warns of action against unlicensed firecracker stalls Pune print news
पिंपरी: विनापरवाना फटाका स्टॉलवर महापालिकेची नजर
india strong reaction against 9 sports dropped from commonwealth games 2026
अन्वयार्थ : राष्ट्रकुल स्पर्धेचा वाद… अकारण नि अवाजवी!
profit of kpit technologies in automotive sector
 ‘केपीआयटी’ला २०३ कोटींचा तिमाही नफा
New Zealand batter Chad Bowes World Record Smashes fastest List A double hundred in 103 balls
VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक

हेही वाचा – VIDEO: ईशान किशनच्या प्रश्नाने सूर्यकुमार पडला धर्म संकटात! पत्नीच्या भीतीने दिले ‘हे’ उत्तर

गेल्या काही दिवसांत भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी अनेकदा अशा परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली आहे. शनिवारी (३० जुलै) फक्त ४९ किलो वजन असलेल्या मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या दिवशी, ६६ किलो वजनाच्या जेरेमी लालरिनुंगाने १४० किलो वजन उचलले. तर, ७३ किलो वजनाच्या अचिंत शेउलीने डोक्यावर जवळजवळ अडीच पट जास्त वजन तोलून धरले.

जेरेमी आणि मीराबाई सारख्या वेटलिफ्टिंगपटूंनी हजारो तास काम करून वजन उचलण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. फक्त आत्मसातच नाही तर ते योग्य पद्धतीने कसे वापरायचे, यासाठीही त्यांनी कष्ट घेतले आहेत.

वजन उचलण्याचा तंत्राचा कस लावणारे ‘थ्री पुल्स’

पटियाला येथील राष्ट्रीय शिबिराचा भाग असलेले शिवलिंगम म्हणाले, “स्नॅच प्रकारात जेरेमीचे तंत्र जवळपास परिपूर्ण आहे. स्नॅच हा स्पर्धेचा पहिला भाग असतो, जिथे बारबेल एका झटक्यात डोक्याच्या वर उचलावा लागतो. अशा वेळी तुमच्या कोपराची स्थिती थोडी बदलू शकते, तुमचे डोके थोडे पुढे ढकलले जाऊ शकते. अशा गोष्टी नेहमीच घडतात.”

हेही वाचा – लवकरच सुरू होणार आणखी एक आयपीएल? माजी निवडकर्त्याने दिले संकेत

जेरेमीकडे असलेले स्नॅच प्रकारातील तंत्र जवळजवळ निर्दोष का आहे? हे स्पष्ट करण्यासाठी शिवलिंगमने स्नॅच लिफ्टचे तीन मुख्य घटकांमध्ये विभाजन केले. ‘फर्स्ट पुल’ करताना बारबेल जमिनीपासून साधारणपणे मांडीच्या उंचीवर आणणे आवश्यक आहे. या टप्प्यावर ‘सेकंड पुल’ सुरू केला जातो. ज्यामध्ये पाय आणि नितंबांचा वापर करून बारबेलला जांघेच्या समांतर आणले जाते. त्यानंतर सुरू होणाऱ्या ‘थर्ड पुल’साठी वेग आवश्यक असतो.

“अनेकदा फर्स्ट पुल निर्णायक असतो. जेव्हा तुम्ही बारबेल जमिनीवरून खेचता तेव्हा ते ९० अंशाच्या कोनात असावे. त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही मागे किंवा पुढे पडण्याची शक्यता असते. जेरेमी फर्स्टचे पुलवर कमालीचे प्रभुत्व आहे. फर्स्ट पुलदरम्यान त्याचा पाय जमिनीवरू एक क्षणही हालला नाही,” असे सतीश शिवलिंगम म्हणाले.

Weightlifting
फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस

उंची कमी असल्याचा थोडा फायदा होतो

जेरेमीची उंची पाच फुट सात इंच आहे. आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेतील चार सुवर्णपदक विजेत्यांपैकी तो सर्वात उंच आहे. मीराबाई फक्त चार फुट पाच इंच उंचीची आहे. कमी उंचीच्या खेळाडूंना जास्त फायदा होतो. लिफ्टरचे हात लांब असल्यास, वैध लिफ्टसाठी त्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात.

याबाबत बोलताना सतीश म्हणाले, “राष्ट्रीय स्तरावरील माझ्या अनेक वर्षांच्या स्पर्धांमध्ये मी एक गोष्ट पाहिली आहे की, ईशान्येकडील लिफ्टर्स चांगली कामगिरी करतात. कारण, त्यांचे हातपाय तुलनेने लहान आहेत. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिनीचे खेळाडू वर्चस्व गाजवतात.”

४९ किलो गटात क्लीन अँड जर्कमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या मीराबाईचे उदाहरण सतीश यांनी दिले. २०१४राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मीराबाईने स्पर्धेच्या ९५ किलो वजन उचलून दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतरच्या आठ वर्षांत तिने तिच्या तंत्रात सुधारणा करून आणि अनेक लहान टिश्यूजचे कंडिशनिंग करून त्या वजनात २४ किलोची भर घातली आहे.

गुरुत्वाकर्षणाला हुलकावणी देता येते

“वजन उचलताना श्वास घेण्याचे कौशल्य अतिशय महत्त्वाचे असते. जड वजन उचलल्याने मज्जासंस्था बंद आणि श्वसननलिका आकुंचित होऊ शकते, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. बारबेल जमिनीवरून खांद्यावर घेतली जाते तेव्हा त्याला काही सेकंद विश्रांती देणे गरजेचे आहे. त्या वेळी तुम्ही सरळ उभे असता. तिथे श्वास घेण्यास वेळ मिळ्यास शरीर ताजेतवाने होते. मात्र, तुम्हाला हे सर्व तीन ते चार सेकंदात करावे लागते”, असे सतीश म्हणाले.

आठ वर्षाच्या काळात मीराबाईने मजबूत शरीर विकसित केले. तिच्या शरीराच्या वजनाच्या दुप्पट लोह उचलताना तिच्या शरीरावर किती दबाव येतो, याचा अभ्यास करून श्वासोच्छवासाच्या कौशल्यांवर काम केले. वरील लहान-मोठी तंत्रे बारकाईने आत्मसात केल्यामुळेच वेटलिफ्टिंगपटू आपल्या वजनाच्या कित्येक पट वजन उचलू शकतात.