रविवारी ग्रेटर नोइडातील बुद्धा सर्किटवर सलग तिसऱ्यांदा इंडियन ग्रां.प्रि.मध्ये अव्वल स्थान पटकावत सेबॅस्टियन वेटेलने विश्वविजेतेपदावर कब्जा केला. फॉम्र्युला वन विश्वातला नवा महान खेळाडू म्हणून सेबॅस्टियन वेटेलच्या नावाची चर्चा सुरू असतानाच फॉम्र्युला वनचे सर्वेसर्वा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. लंडन उच्च न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यामुळे इक्लेस्टोन यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. २००६ मध्ये जर्मनीतील एका मोटारस्पोर्ट मालिकेच्या विक्रीच्या वेळी ४४ दशलक्ष डॉलर्सच्या कथित व्यवहारासंदर्भात इक्लेस्टोन वादात अडकले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून इक्लेस्टोन यांच्यावर खटला दाखल करावा तसेच तसेच विश्वासाचा भंग केल्याप्रकरणी याविषयी जर्मन न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.
दरम्यान इक्लेस्टोन यांच्याकडून पैसे स्वीकारल्याप्रकरणी जर्मनीतील बँकेचे गेरहार्ड ग्रिबकोवस्की हे तुरुंगवास भोगत आहेत. बायर्न एलबीचे समभाग सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सला दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई झाली होती.
लंडनमध्ये दाखल झालेल्या खटल्यात जर्मन माध्यम कंपनी कॉन्स्टॅटिन मीडिइन यांनी इक्लेस्टोन यांच्यासह तीन जणांवर दावा दाखल केला आहे. समभाग विक्रीच्या वेळी एफवनचे मूल्य घसरवण्याचा आरोपावरून खटला दाखल करण्यात आला आहे. ३.८ अब्ज डॉलर्स संपत्तीचे मालक असलेले इक्लेस्टोन लंडनच्या न्यायालयात उपस्थित नव्हते. मात्र पुढील आठवडय़ात ते न्यायलयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Story img Loader