IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal : न्यूझीलंडने रविवारी (२ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर भारताचा २५ धावांनी पराभव करून ३ सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला. ऋषभ पंत वगळता कोणताही भारतीय फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मात्र, त्याची उत्कृष्ट खेळी वादग्रस्त पद्धतीने आऊट झाल्याने संपुष्टात आली. यापूर्वीही तो दोनदा बचावला होता. एकदा किवी संघाने रिव्ह्यू घेतला नाही, तर एकदा रिव्ह्यू वाया गेला होता. आता ऋषभ पंतच्या वादग्रस्त पद्धतीने आऊट होण्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने प्रतिक्रिया दिली आहे.

एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?

एबी डिव्हिलियर्सने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, वाद! पुन्हा एकदा किंचित अस्पष्ट बाब आहे. पंतची बॅट लागली की नाही? अडचण अशी आहे की, जेव्हा चेंडू बॅटच्या जवळून जात होता, त्याचवेळी फलंदाजाची बॅट पॅडवर आदळली आणि स्निकोने आवाज कॅच केला. पण फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागला की नाही याची खात्री कशी होणार? मला याची नेहमीच काळजी वाटत असते आणि इथे एका मोठ्या कसोटी सामन्यात निर्णायक क्षणी असे घडते. मग तुमचे हॉटस्पॉट कुठे आहे?”

India Senior Players Refuse to Play Duleep Trophy Before Home Test Series Rohit Sharma Virat Kohli IND vs NZ
भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी BCCI च्या निर्णयानंतरही दुलीप ट्रॉफी खेळण्यास दिलेला नकार, किवींविरूद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर मोठा खुलासा?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई
Samson's disclosure about Rohit Sharma
Sanju Samson : मी फायनल खेळणार होतो पण टॉसच्या आधी १० मिनिटं… संजू सॅमसनने सांगितला किस्सा

तुम्ही मैदानावर घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहता –

तो पुढे म्हणाला, “सत्य हे आहे की कदाचित शंका आली असावी. मग तुम्ही मैदानावरील पंचांच्या निर्णयावर ठाम राहायला हवे होते का? जोपर्यंत तिसऱ्या पंचाने काही स्पष्टपणे पाहिले नसेल? मला याबाबत खात्री नव्हती. त्यामुळे मला चुकीचे समजू नका, मी येथे कोणताही पक्षपात करत नाही, मी फक्त सातत्यपूर्ण निर्णय घेण्यास आणि तंत्राचा चांगला वापर करण्यासाठी जोर देत आहे.”

हेही वाचा – AUS vs PAK Updates : पॅट कमिन्सने पाकिस्तानला दिला चौथा धक्का! कामरान ५ धावा काढून तंबूत परतला

u

नक्की काय झालं होतं?

२२व्या षटकातील एजाज पटेलचा एक चेंडू स्पीन होत आत आला. ज्यावर ऋषभ पंतने पायाचा वापर करुन:चा बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू वेगाने उसळी घेऊन आणखी आत आला. यानंतर चेंडू बॅटच्या जवळून गेला आणि पॅडवर आदळून उंच उडाला. जो किवी संघाचा क्षेत्ररक्षक टॉम ब्लंडेलने पुढे सरसावत अलगद झेलला. न्यूझीलंड संघाला खात्री होती की चेंडूने बॅटची कड घेतली आहे, पण पंत चेहऱ्यावर हसू आणून बाजूला झाला. कारण त्याला खात्री होती की चेंडूने बॅटची कडा घेतली नाही. मात्र, न्यूझीलंड संघाला विश्वास होता, त्यामुळे त्यांनी जोरदार अपील केले आणि अंपायरने ती फेटाळली.

हेही वाचा – IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

आता टॉम लॅथमला निर्णय घ्यायचा होता. न्यूझीलंडकडे फक्त एकच रिव्ह्यू शिल्लक होता, पण पंतने ६४ धावांवर शानदार फलंदाजी करत होता. त्यामुळे त्यांनी रिव्ह्यू घेण्याचा ठरवले. अल्ट्राएजने लवकर स्पष्ट स्पाइक्स दाखवले आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पण पंतला खात्री पटली की स्पाइक बॅटमुळे नाही तर पुढच्या पॅडमुळे झाला आहे. टीव्ही अंपायर पॉल रायफल यांना वाटले की चेंडू प्रथम बॅटला लागला. त्यामुळे त्यांनी मैदानी अंपायरला आपला निर्णय बदलायला सांगितला. ज्यामुळे ऋषभ पंतला माघारी परतावे लागले.