PAK vs NZ updates in marathi: पाकिस्तान वि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिला सामना कराचीमध्ये खेळवला जात आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ३२० धावा करत मोठी धावसंख्या उभारली आहे. पाकिस्तान संघ २० षटकं झाली असूनही १०० धावाही करू शकलेला नाही. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फखर जमानवर बंदी घालण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फखर जमान हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर आहे पण तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सलामीला उतरला नव्हता. मोठी गोष्ट म्हणजे त्याला तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. पण यामागाचं नेमकं काय कारण आहे?

फखर जमानवर २० मिनिटांची बंदी घालण्यात आली होती ज्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकला नाही. न्यूझीलंडच्या डावातील दुसऱ्याच चेंडूवर फखर जमानला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. बऱ्याच कालावधीनंतर तो मैदानात तंदुरुस्त होत परतला. आयसीसीच्या नियमांनुसार त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले.

आयसीसीच्या नियमामुळे फखर जमानला २० मिनिटं फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. नियमांनुसार, जर एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर राहिला, तर त्याला फलंदाजी करतानाही काही काळ मैदानाबाहेर राहावे लागते. या नियमानुसार पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान फखर जमानला २० मिनिटं बाहेर बसावे लागले. त्यामुळेच पाकिस्तानला सौद शकील आणि बाबर आझम यांना सलामीला पाठवावे लागले.

याचा मोठा दुष्परिणाम सौद शकील ६ धावा करून बाद झाला. शकील २० मिनिटंही क्रीझवर टिकू शकला नाही आणि परिणामी मोहम्मद रिझवानला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले. रिझवानही मोठी खेळी करू शकला नाही. खेळाडू १४ चेंडूत केवळ ३ धावा करू शकला. तर फखर जमान ४१ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावा करत क्लीन बोल्ड झाला. सामन्याच्या सुरूवातीला झालेल्या दुखापतीचा फखर जमानला फलंदाजी करताना त्रास होताना दिसला. फखर जमानच्या कंबरेतही दुखापत झाली होती, फलंदाजी करताना त्याला वेदना होत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. पाकिस्तानचा संघ पहिल्या सामन्यात बॅकफूटवर आहे.