Football Player Racially Abused & Beaten Video: आयव्हरी कोस्टमधील एका फुटबॉलपटूने केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एका फुटबॉलच्या सामन्यात मैदानातच त्याच्यावर जमावाने हल्ला केल्याचा आरोप लगावला आहे. डेररासौबा हसने ज्युनियर असे या फुटबॉलपटूचे नाव असून त्याने स्थानिक पोलिसांकडे केलेल्या तक्रार नोंदवली आहे. डेररासौबाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, त्याला जमावाकडून दगड मारण्यात आले आणि काहींनी त्याला वर्णभेदी कमेंट्स करून अपमानास्पद वागणूक दिली.

इंडियन एक्सस्प्रेसच्या वृत्तानुसार, हसने ज्युनियरला जवाहर मावूर या फुटबॉल क्लबने ‘सेव्हन्स फुटबॉल’ (दोन्ही बाजूंच्या संघात प्रत्येकी सात खेळाडू असलेला सामना) खेळण्यासाठी नियुक्त केले होते. तत्पूर्वी १० मार्चला हा पश्चिम आफ्रिकन देशाचा खेळाडू आरीकोडेजवळ फाइव्ह-ए-साइड सामना खेळण्यासाठी गेला असताना त्याच्यावर हा कथित हल्ला झाल्याचे सांगण्यात येतेय.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…

मलप्पुरम जिल्हा पोलिस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत हसने म्हणाले, “माझा संघ एका ‘गोल’च्या आघाडीवर असताना आमच्या संघाला कॉर्नर किक मिळाली. मी तेव्हा कोपऱ्यातील फ्लॅग जवळ व तिथून किक करणार होतो पण तेव्हा स्थानिक प्रेक्षकांनी मला माकड म्हणून हिणवले . प्रेक्षकांपैकी एकाने माझ्यावर दगड फेकला जो माझ्या डोक्याला लागला. मी मागे वळलो तेव्हा आणखी दोन दगड माझ्यावर फेकले गेले आणि ते माझ्यावर ओरडू लागले. माझ्यावर दगडफेक करणारे लोक ‘आफ्रिकन माकड’, ‘काळी मांजर’ म्हणत होते.”

” माझा जीव वाचवण्यासाठी मी पळून गेलो. समर्थक आणि विरुद्ध संघातील लोकांनी माझ्यावर दगडफेक केली. त्यांनी मला क्रूरपणे मारहाण केली. माझ्या टीमच्या समर्थकांनी हस्तक्षेप करून त्यांना थांबवल्यानंतर मी तिथून पळ काढला. पण माझ्या वर्णामुळे माझ्यावर हल्ला झाला यामुळे मी खूप अस्वस्थ झालो आहे, माझ्या जातीचा आणि माझा अपमान झाला आहे.”

https://x.com/IndianExpress/status/1767946946247889156?s=20

हे ही वाचा<< धक्कादायक! राजकीय पक्षाचं कौतुक केल्याने ट्रोल झालेल्या महिलेने ट्रेनसमोर मारली उडी; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, बुधवारी ही तक्रार आरीकोडे पोलिसांकडे पाठवण्यात आली असून त्यांनी पुढील कारवाईसाठी हसनेचा जबाब नोंदवून घेतला आहे. मलप्पुरम आणि केरळच्या इतर उत्तरेकडील जिल्ह्यांतील सेव्हन्स टूर्नामेंटमध्ये आफ्रिकन देशांतील खेळाडू हे प्रमुख आकर्षण असतात. सामान्यत: खचाखच भरलेल्या गर्दीत हे सामने नोव्हेंबर ते मे या कालावधीत आयोजित केले जातात. २०१८ मध्ये मल्याळम चित्रपट ‘सुदानी फ्रॉम नायजेरिया’ मध्ये केरळमध्ये या सामन्यांमध्ये खेळणाऱ्या आफ्रिकन देशांतील फुटबॉलपटूंच्या आयुष्याची झलक दाखवली होती.

Story img Loader