एका प्रसिद्ध मॉडेलने तिचं आयुष्य संपवलं आहे. मात्र तिच्या आत्महत्येमुळे IPL चा खेळाडू अडचणींत सापडला आहे. तानिया सिंह नावाच्या मॉडेलने आयुष्य संपवलं आहे. २८ वर्षीय तानिया सिंहने आत्महत्या केली. डिझायनिंग आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात ती काम करत होती. इन्स्टाग्रामवर तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या इन्स्टा बायोमध्ये तिने लिहिलं आहे की की ती डिस्क जॉकी, मेक अप आर्टिस्ट आणि मॉडेल आहे. तिने आत्महत्येपूर्वी आयपीएल क्रिकेटपटूला फोन केला होता. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉडेलमुळे क्रिकेटर अडचणीत

इंड‍ियन प्रीम‍ियर लीग (IPL) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणारा अभिषेक शर्मा मॉडेलच्या आत्महत्येमुळे अडचणीत सापडला आहे. सूरतच्या स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला समन्स पाठवलं आहे. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सूरतमध्ये आपला तपास सुरु केला. या दरम्यान IPL मधील सनरायजर्स हैदराबाद टीमचा खेळाडू अभिषेक शर्माचं नाव समोर आलय. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याच तपासात समोर आलं आहे.

तानिया आणि अभिषेक काही काळापासून संपर्कात नव्हते

तानिया आणि अभिषेक मागच्या काही काळापासून संपर्कात नव्हते, हे सुद्धा तपासात दिसून आलं आहे. पण चौकशीसाठी पोलिसांनी अभिषेकला सुद्धा बोलावलं आहे. अभिषेक आणि तानियाच्या मैत्रीबद्दल पोलिसांना तपासातून माहिती मिळणार आहे. मॉडल तान‍िया रात्री उशिरा घरी परतली. त्यानंतर तिने आयुष्य संपवलं. तानियाच्या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय.

हे पण वाचा- प्रसिद्ध पॉर्नस्टार काग्नी लिनचे ३५ व्या वर्षी निधन; जॉनी सीन्सबरोबरच्या फिल्म्समुळे मिळालेली प्रसिद्धी

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, तानियाच्या कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य आहेत. तिने शेवटचा कॉल सुद्धा अभिषेक शर्माला केला होता. जीवन संपवण्यामागे प्रेमसंबंध तर कारण नाही ना? या अँगलने पोलीस आता चौकशी करत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous model tania singh end her life after investigation police sent summons to ipl srh cricketer abhishek sharma scj