महेंद्रसिंह धोनीचे करोडो चाहते आहेत, पण काही लोक असे आहेत ज्यांचा धोनीही ‘फॅन’ होतो. धोनीच्या फक्त एका भेटीसाठी हरयाणातून १४३६ किमी चालत रांचीला पोहोचलेला अजय गिल त्यापैकीच एक आहे. अखेर त्याची माहीला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. अजय गिलने धोनीला मिठी मारली आणि मी पण तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले. मग धोनीनेही अजयसोबत इतर चाहत्यांचेही मन जिंकले. त्याने अजयला विमानाने हरयाणाला परत पाठवण्याची व्यवस्था केली.
हरयाणातून रांचीला पोहोचलेल्या अजयला धोनीने फार्म हाऊसमध्ये बोलावले. समोर आपला लाडका नायक दिसताच अजयने त्याला मिठी मारली आणि सेल्फीसाठी पोज दिली. धोनीने त्याला त्याच्या बॅटवर ऑटोग्राफ आणि शुभेच्छा दिल्या. धोनीने अजयची त्याच्या फार्म हाऊसवर राहण्याची व्यवस्थाही केली होती.
हेही वाचा – काही कळायच्या आतच भुवीनं उडवली ‘वर्ल्डकप हिरो’ची दांडी..! पाहा भन्नाट इनस्विंग गोलंदाजीचा VIDEO
१८ वर्षीय अजय धोनीचा जबरदस्त चाहता आहे. धोनीला भेटण्यासाठी त्याने हरयाणातील त्याच्या गावातून रांचीला पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्याने २९ जुलै रोजी आपला प्रवास सुरू केला. १६ दिवसात सुमारे १४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तो रांचीला पोहोचला. मात्र, तो धोनीला भेटू शकला नाही, कारण धोनी आयपीएलसाठी चेन्नईत होता. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१चे विजेतेपद पटकावले. त्यानंतर धोनी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा मेंटॉर झाला.
धोनीच्या निवृत्तीनंतर अजयनेही…
टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, अजय म्हणाला होता, ”मी धोनीला भेटल्यानंतर घरी परतेन. धोनीने भेटायला किमान १० मिनिटे दिली पाहिजेत, कारण मी लांबून पायी आलो आहे.” जेव्हा अजयला सांगितले गेले, की धोनी तीन महिन्यांनी रांचीला येईल, तेव्हा त्याने तिथे थांबण्याचा आग्रह धरला. अजय त्याच्या गावात एका सलूनमध्ये काम करतो. त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते, पण धोनीच्या निवृत्तीनंतर त्याने खेळणे बंद केले.