Haris Rauf rescued fan from security guard : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाला सामोर लागले. यामुळे क्रिकेट विश्वात पाकिस्तान क्रिकेटची चांगली फजिती झाली होती. या मालिकेत शान मसूद-बाबर आझमसारखे खेळाडू धावा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले होते, ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक लहान चाहता सुरक्षेचा घेरा तोडून बाबर आझमला भेटण्यासाठी मैदानात उतरतो. त्यानंतर हारिस रौफने त्या चाहत्याला सुरक्षा रक्षकापासून वाचवून सर्वांची मनं जिंकली.

बाबर आझमच्या चाहत्याला हारिस रौफने वाचवले –

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, संघाच्या सरावाच्या वेळी एक लहान मुलगा सुरक्षा रक्षकांचा घेरा तोडून मैदानात प्रवेश करतो. त्या मुलाने मैदानात प्रवेश करताच सुरक्षा रक्षक त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावतो. दरम्यान, हारिस रौफ त्या मुलाकडे येतो आणि त्याला सुरक्षा रक्षकापासून वाचवतो. यानंतर त्या लहान चाहत्याला पुन्हा स्टँडवर सोडतो. यावेळी एक सुरक्षा रक्षक हारिस रौफकडे येतो, पण हारिस चाहत्याला सुरक्षा रक्षकाच्या हवाली करत नाही.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
bashar assad palace Video
Bashar Assad Palace Video : रोल्स रॉइस, फरारी अन्… असाद यांच्या राजवाड्यात घुसलेल्या सीरियन बंडखोरांना काय सापडलं? Video आला समोर
incident of looting jewels from owner of Sarafi Pedhi at gunpoint It happened on Sunday night in Sarafi peth on B T Kavade street
बी. टी. कवडे रस्ता भागात सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने दागिन्यांची लूट
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली

चाहत्यांनी स्टेडियमध्ये ‘हारिस-हारिस’च्या घोषणा दिल्या –

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची ही कृती पाहून स्टेडियममधील उपस्थित चाहते ‘हारिस-हारिस’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. या दरम्यान तो लहान चाहता स्टँडमध्ये जातो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर चाहते वेगवान गोलंदाज हारिस रौफचे कौतुक करत आहेत. बाबर आझमबद्दल बोलायचे तर सध्या त्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार दिसत आहे. तो पाकिस्तान संघाच्या मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमधील संघाचा कर्णधार आहे. पण त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – IND vs BAN : ‘आता माझे लक्ष्य…’, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याच्या आव्हानाबाबत शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, अर्धशतकांचे मोठ्या…

या व्हिडीओवर चाहत्यांनी जबरदस्त आणि सुंदर प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, “आनंददायक दृश्य.” याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, “तो एक लीजेंड आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले, “तो एक क्षण होता.”

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

हारिस रौफची आतापर्यंतची कारकीर्द –

वेगवान गोलंदाज हारिस रौफ मुख्यतः पाकिस्तानसाठी मर्यादीत षटकातील क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत १ कसोटी, ३७ एकदिवसीय आणि ७२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या कसोटीत त्याने १ विकेट्स घेतली आहे. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात ६९ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १०२ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader